बुलडाणा, 15 फेब्रुवारी: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या महागड्या मागण्यामुळे (Expensive gifts) येथील एका तरुणाला थेट जेलची हवा खावी लागली आहे. प्रेयसीचा हट्ट पुरवता यावा म्हणून येथील एक तरुण चक्क अट्टल गुन्हेगार बनला आहे. प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तो आपल्या काही साथीदारांसह दुचाकी, मोबाइल चोरी (man became theft to fulfill girlfriend's demands) असे गुन्हे करत होता. पण पोलिसांना या टोळीचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक (Accused arrested) केली आहे. त्यानंतर चोरीचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
शेख शाहरूख शेख फिरोज, शेख मोबीन शेख हारून, अमन खान अस्लम खान आणि मुन्शिफ खान अल्ताफ खान असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शेगाव शहरातून या चारही आरोपींना ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून विविध महागड्या वस्तू, दुचाकी आणि इतर ऐवज जप्त केला होता.
हेही वाचा- Mumbai: बुरखा घालून टाकला परफेक्ट दरोडा; पण यामुळे झाला गजाआड, 8 किलो चांदीसह पळवला होता लाखोंचा ऐवज
या प्रकरणी तपास करत असताना प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण चोरी करत असल्याची कबुली आरोपी शेख शाहरूख शेख फिरोज यानं दिली आहे. चोरी करण्यामागचं कारण ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चारही चोर प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबातील आहेत. सर्वांना महागडे फोन, महागड्या दुचाकी आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची सवय लागली होती. पण आपली लाईफस्टाईल संभाळत प्रेयसीच्या मागण्या कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न आरोपीला पडला होता.
हेही वाचा-रिकामटेकड्या तरुणांचं विकृत कृत्य; अल्पवयीन मुलांना सेक्स करण्यास पाडलं भाग अन्
मग त्यांच्यापुढे चोरी करणं हाच एकमेव पर्याय दिसला आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणाने आपल्या काही साथीदाराच्या मदतीने शेगाव शहरात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांना या टोळीचा सुगावा लागल्यानंतर, पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Crime news, Theft