नितीन बनसोडे, प्रतिनिधी
लातूर, 29 ऑक्टोबर : 'तू माझ्या बायकोवर बलात्कार (Rape) केला असल्याची खोटी केस (Fake Police case) पोलिसांत दाखल करून तुझी नोकरी घालवतो', अश्या धमक्या देऊन पाचशेपेक्षा देखील अधिक लोकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या एका भामट्याला अखेर भादा पोलिसांनी रंगेहाथ खंडणी (Ransom) वसूल करताना अटक (Arrest) केली आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या दैवताळा गावातील रहिवाशी असलेल्या विठ्ठल चव्हाण याने हा प्रताप केला. गावात त्याने गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीचा धंदाच सुरू केला होता.
राज्य सरकारचा नवा आदेश; शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना महत्त्वाची सूचना
विठ्ठल चव्हाण हा नोकरीवर असलेल्या लोकांना तो गाठायचा आणि त्यांच्याशी मैत्री करायचा. चांगली ओळख झाली ही विठ्ठल डाव साधायचा. 'तू माझ्या बायकोवर बलात्कार केलास, अशी पोलिसांत केस करून तुझी नोकरी घालवतो', अशी धमकीच तो समोरच्या व्यक्तीला द्यायचा.
विठ्ठलने अचानक बलात्काराची धमकीच दिल्यामुळे समोरील व्यक्ती बुचकळ्यात सापडून जात होती. त्यामुळे अनेकांनी त्याच्या धमकीला घाबरून पैसे देखील दिले होते. त्याच्या या हरकतीमुळे संपूर्ण गावाचं दहशतीखाली आलं होतं. अखेर गावातीलच एका फिर्यादीनं याची माहिती व तक्रार पोलिसांना दिली.
अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार, CM राज्यपालांना भेटण्याची शक्यता
विठ्ठलने या फिर्यादीलाही नेहमीच्या पद्धतीने बलात्काराची धमकी देऊन खंडणी मागितली होती. पोलिसांनी सापळा रचला आणि विठ्ठलला खंडणीचे पैसे घेताना रंगेहात पकडून अटक केली.
आरोपी विठ्ठल चव्हाण याच्या अटकेमुळे संपूर्ण गावातल्या लोकांनीच सुटकेचा श्वास घेतला आहे. विठ्ठल चव्हाणला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.