मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हॉटेलमध्ये युवा नेत्याची आत्महत्या; मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ

हॉटेलमध्ये युवा नेत्याची आत्महत्या; मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ

युवा नेत्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

युवा नेत्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

युवा नेत्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 4 सप्टेंबर : रत्नलोक कॉलनीतील (Indore News) हॉटेल शिवछात्रामध्ये एनएसयूआय विद्यार्थी नेत्याचा (Student Leader suicide) मृतहेद सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सौरभ आगर आमदार विपिन वानखेडे यांच्या जवळचे आहेत. अद्याप आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे व्यवस्थापत आशुतोष उपाध्यायने दुपारी सांगितलं की, पहिल्या मजल्यावरील रुम नंबर 101 मध्ये 27 वर्षीय सौरभ वानखेडे यांनी गळफार घेऊन आत्महत्या केली आहे.

उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ शुक्रवारी हॉटेलमध्ये थांबला होता. दुपारपर्यंत खोलीच्या बाहेर आला नसल्याने कर्मचाऱ्यांनी रुमची बेल वाजवली. तेव्हा कळालं की त्याने खोलीत गळफार घेतला आहे. पोलिसांनी सांगितलं की, सौरभ हा आमदारांसोबत दौऱ्यावर जात असे. शुक्रवारी कुटुंबीयांना वाटलं की, सौरभ आमदाराबरोबर बाहेर गेला आहे. अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

हे ही वाचा-एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ; एक एक करीत सोडला जीव

आणखी एक आत्महत्या

राऊ पोलीस ठाणे हद्दीतील साईकृपा कॉलनीत 19 वर्षीय पूजा सोळंकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे वडील शेतकरी आहेत. ती बहीण कवितासह नीटच्या परीक्षेची तयारी करीत होते. कविताने पोलिसांना सांगितलं की, शुक्रवाी नाईट ड्यूटी होती. सकाळी परतले तर पूजा मृत अवस्थेत दिसली. कुटुंबीयांनी सांगितलं की, ती अभ्यासावरुन तणावात होती. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

First published:

Tags: Crime, Indore, Suicide