मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भावाचं अपहरण, नंतर पुण्यात घडलं भयानक कांड

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भावाचं अपहरण, नंतर पुण्यात घडलं भयानक कांड

आरोपीचे मृत आदित्यच्या मोठ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते.

आरोपीचे मृत आदित्यच्या मोठ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते.

आरोपीचे मृत आदित्यच्या मोठ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 18 सप्टेंबर : पुण्यात 10 सप्टेंबरला भोसरी एमआयडीसीतील इमारतीच्या गच्चीत सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. या मुलाच्या मृतदेहानंतर ही घटना नेमकी कशी घडली, याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आदित्य ओगले असे 7 वर्षीय मुलाचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून त्याची हत्या करण्यात आली, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आरोपीचे मृत आदित्यच्या मोठ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. याच एकतर्फी प्रेमामुळे त्याने राहत्या इमारतीच्या पार्किंग लॉटमधून आदित्यचे अपहरण केले होते. यावेळी आदित्यने मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र, आरोपीने त्याचे नाक आणि तोंड दाबले. यामुळे श्वास गुदमरल्यानं आदित्यचा मृत्यू झाला होता. याप्रकारानंतर आरोपी घाबरला. त्यामुळे त्याने आदित्यचा मृतदेह भोसरी एमआयडीसी परिसरातील एका इमारतीच्या गच्चीत नेऊन टाकला होता. हे प्रकरण अपहरणाचे आहे, यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने आधी आदित्यच्या कुटुंबियांना एसएमएस करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, आदित्यची हत्या पैशांसाठी नाही, तर आदित्यच्या मोठ्या बहिणीवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून झाली आहे, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्येप्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. तपासात आली धक्कादायक माहिती - अपहरण झालेल्या आदित्यची मदत करण्यासाठी आरोपी मंथन हा स्वतः ओगले कुटुंबियांना सहकार्य करत आहे, असे भासवत होता. तसेच तो पोलीस तपासातही मदत करत होता. मात्र, खंडणीसाठी ज्या नंबरवर एसएमएस करण्यात आला होता, त्या नंबरचा सायबर पोलिसांनी तपास केला आणि शेवटी पोलिसांचा संशय खरा ठरला. याच नंबरने मंथनने रचलेले हत्याकांडाचा खुलासा केला. मंथन याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची कसून चौकशी करण्यात आल्यावर या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली. आदित्यच्या अपहरणाच्या 10 दिवस आधीपासून मंथन आणि त्याच्या सहकाऱ्याने हा कट रचला होता. आरोपी मंथन हा आदित्यच्याच इमारतीत राहत होता. सोसायटीच्या मालकांकडून त्याच्याविरोधात याआधीही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आदित्यचं अपहरण केल्यानंतर मंथन याने उत्तर प्रदेशातील एका मजुराच्या फोनची मदत घेतली होती. एकतर्फी प्रेमातून त्यानेच आदित्यची हत्या केली आहे, याचा कुणाला संशयही येऊ नये, यासाठी आरोपी मंथनने 20 कोटी रुपयांच्या खंडणीचा अज्ञात नंबरवरुन मेसेज केला. हेही वाचा - रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार आदित्यचे वडील गजानन ओगले यांना त्याने एक एसएमएस पाठवला. तर गजानन ओगले यांनी आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. खंडणीचा मेसेज आल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर काही तासांत आदित्यचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. अखेर आता या हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. एकतर्फी प्रेमातून हे हत्याकांड घडल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
First published:

पुढील बातम्या