Home /News /crime /

साखरपुडा मोडला गेल्याने तरुणीचं टोकाचं पाऊल, होणारा पती अन् त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

साखरपुडा मोडला गेल्याने तरुणीचं टोकाचं पाऊल, होणारा पती अन् त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

ही घटना अजमेर शहरातील रामगंज पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी घडली.

    अजमेर, 5 जुलै : राजस्थानच्या अजमेर (Ajmer Rajasthan) शहरात धक्कादायक घटना घडल्यानंतर तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. लग्न तुटल्यामुळे मुलगी डिप्रेशनमध्ये (Depression) ही तरुणी नैराश्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे. (Young Girl Commit Suicide) यामुळे त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. याठिकाणी सुसाईड नोटही (Suicide note) मिळून आली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणीने आपल्या मृत्यूचे कारण मोबाईलमध्ये कैद झाल्याचे तिने लिहिले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास कसून करत आहे. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अजमेर शहरातील रामगंज पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी घडली. तिथे राहणाऱ्या एका तरुणीने तिची लग्न तुटल्यामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर यानंतर घटनेची माहिती मिळताच रामगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जेएलएन रुग्णालयात पाठवला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांकडून तरुणीचा मोबाईल जप्त - रामगंज पोलीस ठाण्याचे निरिक्षक देवराम यांनी सांगितले की, मृत तरुणीने आपल्या खोलीत गळफास घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून त्याची सुसाईड नोटही जप्त केली आहे. यामध्ये तरुणीने आपल्या होणाऱ्या नवरा सुधीर आणि त्याच्या प्रेयसीला आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. यासोबतच मृत्यूचे कारण तिच्याच मोबाईलमध्ये असल्याचे लिहिले आहे. यानंतर पोलिसांनी मृत तरुणीचा फोन जप्त केला आहे. तरुणीचा मोबाईल तपासला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा - कर्जाचे पैसे मागायला आलेल्या महिलेला गमवावा लागला जीव, शेजाऱ्यांकडून मृतदेहासोबत धक्कादायक कृत्य याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर मृत तरुणीचा होणारा नवरा आणि त्याची प्रेयसी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे की, तरुणीचा साखरपुडा दोन वर्षांपासून झाला होता. मागील काही दिवसांपासून तो तिला मारहाणही करायला लागला होता. तसेच त्याला या तरुणीसोबत लग्न मोडून दुसरीकडे लग्न करायचे होते. यामुळे मृत तरुणी नैराश्यात गेली होती. शेवटी तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या