सातारा हादरलं, महावितरणच्या कार्यालयातच तरुण अभियंत्याने घेतला गळफास

सातारा हादरलं, महावितरणच्या कार्यालयातच तरुण अभियंत्याने घेतला गळफास

तरुण वयात सुरज देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:

सातारा, 13 डिसेंबर :  सातारा (satara) जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात महावितरण (mahadiscom) कार्यालयामध्येच एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुरज देसाई असं आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. कोरेगाव तालुक्यातील किन्हई गावात ही घटना घडली आहे.  सुरज देसाई हे महावितरण कंपनी अभियंता म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते आज आपल्या कार्यालयात आले होते. पण काही वेळांनी देसाई यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातच त्यांनी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

‘बॉयफ्रेंडमुळे आठ वर्ष वाया गेली’, गर्लफ्रेंडची कोर्टात धाव

कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरज देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करून देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

लग्न केलं नवरीसोबत आणि पळवलं नवरीच्या बहिणीला

सुरज देसाई यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. तरुण वयात सुरज देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील शेळवे इथं गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नाली सत्यवान गाजरे अयं या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या  स्वप्नालीच्या आत्महत्येमुळे शेळवे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांनी मृत मुलीच्या बॅगेत सुसाईट नोट आढळून आली आहे. त्यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या