पाच जणांच्या टोळीने तरुणाच्या डोक्यात वार करून केला खून, संपूर्ण चेहरा दगडाने ठेचला

पाच जणांच्या टोळीने तरुणाच्या डोक्यात वार करून केला खून, संपूर्ण चेहरा दगडाने ठेचला

प्रशांत वाघ असं मृत तरुणाची ओळख पटल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात उपनगर पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • Share this:

नाशिक, 29 फेब्रुवारी : नाशिकमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातपुरच्या युवकाची नाशिक रोड भागात अमानुष हत्या करण्यात आली आहे. डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे तरुणाची ओळख पटू नये यासाठी दगडाने चेहरा ठेचला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जय भवानी रोडवरील मोकळ्या जागेत 4 ते 5 जणांच्या टोळक्याने ही हत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रशांत वाघ असं मृत तरुणाची ओळख पटल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात उपनगर पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

मृत प्रशांत वाघ याबद्दल माहिती काढली असता त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आता पोलीस हत्येचा तपास करत आहेत. अतिशय निर्घृणपणे हत्या केल्यामुळे मृतदेहाचा चेहरा ओखळणं कठीण असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या - दिल्लीनंतर CAA विरोधात आणखी एक राज्य पेटलं; एकाचा मृत्यू, 6 शहरांमध्ये कर्फ्यू

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून प्रशांतचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रशांतच्या हत्येची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर गावात शोककळा पसरली आहे.

अशा प्रकारे तरुणाची काही टोळक्यांनी निघृण हत्या केल्यामुळे तरुणांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे. तर हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस कुटुंबीय आणि परिसरात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अज्ञातांना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत.

इतर बातम्या - पाकचा वेडेपणा तर बघा, आता संसदेत सुरू करणार ब्युटी पार्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 29, 2020 01:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading