मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईतील तरुणानं महिलेची हत्या करून दाताने ओरबडून खाल्लं चेहऱ्याचं मांस, दृश्य पाहून पोलीसही हादरले

मुंबईतील तरुणानं महिलेची हत्या करून दाताने ओरबडून खाल्लं चेहऱ्याचं मांस, दृश्य पाहून पोलीसही हादरले

हत्येनंतर तरुणाने दाताने ओरबडून खाल्लं चेहऱ्याचं मांस (प्रतिकात्मक फोटो)

हत्येनंतर तरुणाने दाताने ओरबडून खाल्लं चेहऱ्याचं मांस (प्रतिकात्मक फोटो)

जंगलात शेळ्या चारणाऱ्या वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. एवढंच नाही तर हत्येतील आरोपीनी मृत महिलेच्या तोंडाचं मांसही ओरबडून खाल्लं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajasthan, India

मुंबई 27 मे : हत्येचं एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यात खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. सरधना परिसरातील जंगलात शेळ्या चारणाऱ्या वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. एवढंच नाही तर हत्येतील आरोपीनी मृत महिलेच्या तोंडाचं मांसही ओरबडून खाल्लं. या कृत्यानंतर त्या तरुणाचा चेहरा रक्ताने लाल झाला होता. घटनेनंतर पळून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

रिपोर्टनुसार, नेहमीप्रमाणे सारधना गावात राहणारी एक वृद्ध महिला शांती देवी शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती. यादरम्यान तरुणाने जंगलात मोठ्या दगडाने महिलेवर हल्ला करून तिचं डोकं फोडलं. अनेकवेळा दगडांनी वार केल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तरुणाने मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस खाल्लं. यानंतर आरोपी तरुणाने स्वतःचा शर्ट काढून मृत वृद्ध महिलेचा चेहरा झाकला.

लेकीनेच रचला जन्मदात्या बापाच्या हत्येचा कट; कारण ऐकून पोलीसही हादरले!

जंगलात शेळ्या चारत असलेल्या लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. हे पाहून आरोपी पळून गेला. गावकऱ्यांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडून सेंद्रा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात आणलं. त्या तरुणाने दाताने महिलेच्या तोंडाचं मांस ओरबडून खाल्ल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलीस तपासात या तरुणाचं नाव सुरेंद्र असून तो मुंबईचा रहिवासी आहे, असं समोर आलं आहे. 24 वर्षीय तरुणाला ड्रग्जचं व्यसन आहे. वृद्ध महिलेच्या हत्येनंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह सेंद्रा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. वृद्ध महिलेची निर्घृण हत्या का करण्यात आली? आणि मुंबईतील तरुण जंगलात काय करायला आला होता? याबाबत पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Shocking news