राज्यात आणखी एक लाजिरवाणा प्रकार, 10 वर्षांच्या चिमुरडीचा लग्न समारंभात विनयभंग

राज्यात आणखी एक लाजिरवाणा प्रकार, 10 वर्षांच्या चिमुरडीचा लग्न समारंभात विनयभंग

देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज नवी मुंबईमध्ये वाट चुकलेल्या असहाय महिलेवर 3 नराधमांनी 2 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घटना ताजी असताना यवतमाळमध्ये एका चिमुरडीचा विनयभंग झाल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना समोर येत आहे.

  • Share this:

यवतमाळ, 27 फेब्रुवारी : देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज नवी मुंबईमध्ये वाट चुकलेल्या असहाय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. दोन तासांमध्ये या पीडित महिलेवर 3 नराधमांनी बलात्कार केला. ही घटना ताजी असताना विदर्भातून आणखी एक लाजिरवाणा प्रकार समोर येत आहे. या घटनेमध्ये 10 वर्षांची चिमुरडी एका नराधमाच्या वासनेचा बळी ठरली आहे.

यवतमाळमध्ये एका चिमुरडीचा विनयभंग झाल्याची घटना समोर येत आहे. लग्न समारंभादरम्यान त्याठिकाणी असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यानेच 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दारव्हा रोड याठिकाणी ही घटना घडली. आपल्या कुटुंबीयांसोबत ही मुलगी एका लग्नसमारंभात गेली होती.त्यावेळी अक्षय चांदेकर या नराधमाने तिचा विनयभंग केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

(हेही वाचा-वाट चुकलेल्या महिलेवर दोन तासांमध्ये 3 नराधमांनी केला बलात्कार)

आई-वडिलांबरोबर ही मुलगी एका लग्न समारंभामध्ये गेली होती.खाऊचं आमीष दाखवत अक्षय चांदेकरने तिला समारंभ सुरू होता त्याठिकाणाहून दूर नेलं आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळी तिथून पळून जात आई-वडिलांना गाठलं आणि घडला प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी तात्काळ पोलिसांकडे याबाबत माहिती दिली.

(हेही वाचा-मुलीच्या मदतीने महिलेने केला सवतीचा खून, 32 वेळा भोसकून मृतदेह जंगलात फेकला)

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सचिन लुले हे तात्काळ त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. अक्षय चांदेकर या नराधमावर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आता याबाबत लोहारा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2020 04:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading