नागपूर, 25 जानेवारी : रागाच्या भरात सुनेने शेजारील निवृत्त जेलरची बंदूक चोरी करून सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सासू पूजा करीत असतानाच सुनेने सासूवर गोळी झाडली. महाराष्ट्रातील यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातील आर्णी गावातून हा प्रकार समोर आला. गावातील पोरजवार कुटुंबातील सासू-सुनांमध्ये वाद होता.
दोघी एकाच घरात राहत होत्या. सोबतच मुलगा अरविंद आणि अरविंदचा भाऊ मंगेशदेखील राहत होता. अरविंद आपल्या आईसोबत भाजी विकण्याचं काम करतो. सासू आणि सुनांमध्ये घरगुती कारणांवरुन वाद होत होता. या वादातून सून सरोजने सासूच्या (Killed Mother-in-law) हत्येचा प्लान आखला.
हे ही वाचा-धक्कादायक! पतीच्या परवानगीशिवाय घेतला स्मार्टफोन, पत्नीच्या हत्येची दिली सुपारी
हत्येवेळी हमाल बाहेरच होता उभा
सोमवारी सासू व्यतिरिक्त घरात कोणीच नव्हते, त्यामुळे सरोजला संधी मिळाली होती. तिने सासूच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि तिच्यावर गोळी चालवून हत्या केली. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सासू आशा पूजा करीत होती. काही वेळापूर्वीच हमाल भाजी घेऊन आला होता. मात्र आशाने पूजा करीत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर हिशोब करते असंही म्हणाली. त्यामुळे हमाल बाहेरच उभा होता. काही वेळानंतर त्याला आवाज आला. मात्र हा आवाज बंदुकीचा असावा असं त्याला वाटलं नाही. बराच वेळ झाला तरी आशा बाहेर आल्या नव्हता. शेवटी तो भाजी बाहेरच ठेवून निघून गेला. यानंतर दुपारी या घटनेचा खुलासा झाला. या घटनेमुळे आर्णी गावात खळबळ उडाली आहे.
शेजारील निवृत्त जेलरची बंदूक चोरली
शेवटी सरोज पोरजवारने आपला गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, सासूची हत्या करण्याचा सरोजचा प्लान होता. तिने शेजारील निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर यांच्या खोलीतून बंदूक चोरली होती. ही चोरलेली बंदूक तिने अनेक दिवस लपवून ठेवली होती. संधी मिळताच तिने सासूच्या डोक्यावर ताणली आणि हत्या केली. सासूची हत्या केल्यानंतर ती खोलीत पाय घसरून पडली आणि तिच्या डोक्यावर जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं सरोजने सांगितलं. हत्येनंतर तिने स्वयंपाकघरात बंदूक लपवून ठेवली.
कसा काढला हत्येचा माग?
दरम्यान आशाच्या मृत्यूची बातमी गावभऱ परसली. हे ऐकून काही वेळापूर्वी घरी आलेल्या हमालला धक्का बसला. त्याला बंदुकीच्या आवाजाची आठवण आली. त्याने पोलिसांना याबद्दल सांगितलं. यानंतर पोलिसांनी सरोजची चौकशी केली आणि सत्य बाहेर आलं. यादरम्यान निवृत्त जेलरने आपली चोरी झालेली बंदुकही ओळखली. बंदूक चोरी झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला. पोस्टमार्टममध्ये आशाच्या डोक्यातून गोळीदेखील सापडली आहे. हा सर्व खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी सरोजला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.