Home /News /crime /

यवतमाळमध्ये पोलिसाच्या घरात तरुणीचा मृतदेह, हत्या की आत्महत्या?

यवतमाळमध्ये पोलिसाच्या घरात तरुणीचा मृतदेह, हत्या की आत्महत्या?

ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला त्याच पोलिसाने तिच्यावर आधी अत्याचार केला. त्यानंतर तिला गळफास लावून तिची हत्या केली, असा आरोप मृतक तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

    यवतमाळ, 26 डिसेंबर : यवतमाळमधून (Yavatmal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक तरुणीच्या वडिलांनी संबंधित पोलीस कर्मचारीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला त्याच पोलिसाने तिच्यावर आधी अत्याचार केला. त्यानंतर तिला गळफास लावून तिची हत्या केली, असा आरोप मृतक तरुणीच्या वडिलांनी केला आहे. तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचारीला ताब्यात घेतलं आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे त्याचं विजय हटकर (वय 42 वर्षे) असं आहे. तो दंगल नियंत्रक पथकातील कर्मचारी असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तसेच संबंधित घटना जेव्हा घडली तेव्हा तो सुट्टीवर होता, अशी देखील माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी पोलीस कर्मचारी विजय हटकर उमरखेडमध्ये राहतो. तिथल्या त्याच्या राहत्या घरीच संबंधित घटना घडली आहे. हेही वाचा : बाळाला औषध देताना आईकडून घडली मोठी चूक; दुसऱ्या दिवशी ड्रममध्ये आढळला मृतदेह खरंतर आरोपी विजय हटकर हा उमरखेड येथील एका परिसरात भाड्याच्या घरात राहतो. त्याने पोलीस खात्यात नोकरी लावून देतो, असं आमिष दाखवून मृतक तरुणीला आपल्या घरी नेलं होतं, असा आरोप मृतक तरुणीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, मुलगी जेव्हा हटकरच्या घरात गेली होती तेव्हा त्याच्या घरमालकाच्या मुलाने तिला बघितलं होतं. त्यावेळी त्याला थोडा संशय आला होता. संबंधित तरुणी ही बराच वेळ झाला तरी घराबाहेर आली नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराचा दरावाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हेही वाचा : भल्या पहाटे नदीकाठी नेत बापानेच 13 वर्षीय मुलाचा घोटला गळा, धक्कादायक कारण समोर संबंधित घटनेची माहिती जेव्हा मृतक महिलेच्या कुटुंबियांना समजली तेव्हा त्यांनी आक्रोश केला. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार करत विजय हटकरवर गंभीर आरोप केलाय. त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालात याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या