पतीला गुंगीचं औषध देऊन पत्नीचे अवैध संबंध, पतीला जाग आली आणि...

पतीला गुंगीचं औषध देऊन पत्नीचे अवैध संबंध, पतीला जाग आली आणि...

गुंगीचं औषध दिलेल्या पतीला रात्री अचानक जाग आली आणि त्याने पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं. आपलं बिंग फुटल्याचं लक्षात येताच तीने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली.

  • Share this:

नवी दिल्ली 18 सप्टेंबर : हरियानातल्या यमुना नगरमध्ये हत्येच्या एका घटनेनं खळबळ उडालीय. एक महिला आपल्या पतीला गुंगीचं औषध देऊन प्रियकराला घरी बोलावून त्याच्याशी संबंध ठेवत असे. एकदा तीने पतीला गुंगीचं औषध दिलं मात्र त्याला रात्री जाग आल्याने पत्नीचं बिंग फुटलं. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेनं हत्येची गोष्ट कबूल केलीय. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केलीय. या घटनेने पोलिसही चक्रावून गेले असून परिसरात खळबळ उडाली आहे. यमुनानगरमधल्या पंजाबी मोहल्ल्यात रवी हा आपल्या पत्नीसोबत राहात होता. रवी हा सेल्समन असल्याने त्याचा बाहेर जास्त वेळ जात असे. त्यामुळे त्याच्या पत्नीचं शेजारी राहणाऱ्या एका ऑटोचालकाशी सुत जमलं. मनजीत असं त्याचं नाव आहे. रवी हा दररोज रात्री घरी आल्यावर पतीच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळत होती. जेवल्यानंतर पती जेव्हा गुंगीच्या औषधामुळे झोपी जात असते त्यानंतर ती मनजीतला फोन करून रात्री घरीच बोलावून घेत असे. त्या दोघांचे वर्षभर असे संबंध ठेवले. त्याचा रवीला पत्ताही लागला नाही.

Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... प्रदीप शर्मांनी स्वतः सांगितला किस्सा

एक दिवस रवीला नेहमीप्रमाने तीनं गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर तीने मनजीतला घरी बोलावून घेतलं. मध्यरात्री पतीला अचानक जाग आल्यानंतर त्याला पत्नी आणि मनजीत नको त्या अवस्थेत दिसले. आपलं बिंग आता फुटलं हे लक्षात आल्याने रवीच्या पत्नीने आणि मनजीतने रवीची हत्या केली आणि त्याच्या मृत्यूचा बनाव रचला.

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी तयार, 'या' तारखेला होणार नावं जाहीर

रवीच्या कुटुंबीयांना खोटं कारण सांगून तीने घटना दडपण्याचा प्रयत्न केला. बेडला डोकं आदळल्याने रवीचा मृत्यू झाल्याचं खोटं कारण तीने त्यांना सांगितलं. मात्र रवीच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तिची कसून चौकशी करताच अखेर तीने खूनाची कबुली दिली आणि सत्य घटना सांगितली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...