मित्रांसोबत पत्नीचा अश्लील व्हिडीओ, भडकलेल्या नवऱ्याने बायकोला घातल्या गोळ्या

मित्रांसोबत पत्नीचा अश्लील व्हिडीओ, भडकलेल्या नवऱ्याने बायकोला घातल्या गोळ्या

आपलं बायकोवर अतिशय प्रेम आहे. मात्र तीचं वागणं योग्य नसल्याने आपण तिच्यासोबत राहत नव्हतो. अनेकदा तिला सांगून पाहिलं मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती असंही नरेशने पोलिसांना सांगितलंय.

  • Share this:

यमुनानगर, 19 सप्टेंबर : हरियानातल्या यमुनानगर इथं एक खळबळजनक घटना समोर आलीय. पत्नीचा आपल्याच मित्रांसोबत अश्लील व्हिडीओ बघितल्याने भडकलेल्या नवऱ्याने बायकोला गोळ्या घातल्या. या हल्ल्यात त्याची बायको गंभीर जखमी असून तिच्यावर चंदिगडमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोर नवऱ्याला अटक केलीय. नरेश असं त्या हल्लेखोर पतीचं नाव असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. नरेश आणि त्याच्या बायकोचं भांडण गेल्या काही महिन्यांपासून होतं. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर राहत होती. मात्र पत्नीचा हा अश्लील व्हिडीओ दिसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिलीय.

महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, भाजप आमदारासह शहराध्यक्षावर गुन्हा

नरेश आणि त्याच्या पत्नीचं सातत्याने भांडण होत असे. त्यामुळे पत्नीने घटस्फोटासाठी अर्जही दिला होता. नरेश त्याच्या काही मित्रांसोबत असताना त्याच्या पत्नीचा त्याच्याच काही मित्रांसोबतचा अश्लील व्हिडीओ त्याने मित्रांच्या मोबाईलमध्ये पाहिला. त्यावरून त्याचा संताप झाला. त्यातच त्याच्या मित्रांनी त्याला भडकवलं. अशी बायको असण्यापेक्षा नसलेली बरी असं त्यांनी त्याच्या डोक्यात भरलं.

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले प्रेमी दाम्पत्य पुण्यात सापडले अशा अवस्थेत...

एवढच नाही तर त्याला देशी कट्टाही आणू दिला. त्यानंतर नरेश हा देशी कट्टा घेऊन बायकोकडे गेला. त्याने तिला जाब विचारला. मात्र तीने उडवा उडवीची उत्तरं दिल्याने तो संतापला. त्याने मित्रांनी दिलेल्या देशी कट्ट्यातून बायकोवर गोळ्या झाडल्या. त्यात ती गंभीर जखमी झाली असून मृत्यूशी झुंज देत आहे.

आपलं बायकोवर अतिशय प्रेम आहे. मात्र तीचं वागणं योग्य नसल्याने आपण तिच्यासोबत राहत नव्हतो. अनेकदा तिला सांगून पाहिलं मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती असंही नरेशने पोलिसांना सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 09:56 PM IST

ताज्या बातम्या