Home /News /crime /

सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'जगातील सर्वात चांगलं सासर'; इंजिनिअर सुनेने स्वत:चाच घेतला जीव

सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'जगातील सर्वात चांगलं सासर'; इंजिनिअर सुनेने स्वत:चाच घेतला जीव

या प्रकरणात महिलेच्या माहेरच्यांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे.

    भोपाळ, 21 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भोपाळमधील अवधपुरी भागात एका विवाहितेने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तिच्याजवळ सुसाईड नोटही सापडली आहे. यात तिने सासरच्या मंडळींचं कौतुक केलं आहे. सुसाइड नोटमध्ये ( Crime News) तिने आत्महत्येसाठी स्वत:ला जबाबदार धरलं आहे. तिने लिहिलं की, मी खूप चुका केल्या आहेत. मला जगातील सर्वात चांगलं सासर मिळालं आहे. माझी इच्छा आहे की, माझा पती कायम हसत राहावा. तुम्हा सर्वांना माझ्या मृत्यूमुळे दु:ख तर होईल, मात्र असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आई-बाबांची खूप आठवण येईल. कानपूरची राहणारी आरती उर्फ अनामिका कैथल (26) हिने बी.टेकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. 2020 मध्ये भोपाळमधील अवधपूरी येथील सतीशसोबत तिचं लग्न झालं होतं. पती ऑर्डनेन्स फॅक्टरीत नोकरी करतो. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सतीशच्या आईने आरतीच्या आईला फोन करून तिने विष घेतल्याचं सांगितलं. यावर आरतीच्या आईने तातडीने भोपाळमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना मुलीच्या घरी पाठवले. नातेवाईक आरतीच्या सासरी पोहोचल्यावर सासरच्यांनी तिला रेडक्रॉस रुग्णालयात बोलावलं. रेडक्रॉसला पोहोचल्यावर आरती तिथेही सापडली नाही. रात्री दहाच्या सुमारास आरतीचे वडील रामदेव कैथल यांना कळले की, मुलीला हमीदिया रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याने नातेवाईकांना हमीदियाकडे पाठवले. तेथे गळफास घेतल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. दुसरीकडे माहेरच्यांचं म्हणणं आहे की, हुंड्यासाठी सासरच्यांनी मुलीची हत्या केली. ते हुंड्यात 10 लाख आणि कारसाठी तिचा छळ करीत होते. हे ही वाचा-पत्नीने दारू प्यायल्याने पतीची सटकली;कुऱ्हाडीचा घाव घालत दिली आयुष्यभराची शिक्षा पती म्हणाला, तू मांस-मासे करीत नाही म्हणून... आरतीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, सासरची मंडळी मुलीचा छळ करीत होते. सतीशदेखील अधिकतर घराबाहेरच राहत होता. रात्री-रात्री घरी येत नसे. यावेळी आरतीने निराशा व्यक्त केली. यावर सतीश म्हणाला की, तू मांस-माशांचा स्वयंपाक करीत नाहीस, म्हणून मला बाहेर जावं लागतं. आता तू एकटीच राहण्याची सवय कर. आरतीने 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शेवटचं वडिलांसोबत बोलली होती. गेल्या दिवाळीला तर तिने वडिलांना सासरहून घेऊन जाण्याची विनंती केली होती. त्यावेळी वडिल सासरच्या मंडळींशी बोललं आणि प्रकरण मिटवलं होतं. त्यात अचानक आलेल्या मुलीच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे कुटुंबाला धक्काच बसला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Suicide

    पुढील बातम्या