धडगाव, 27 मार्च: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव बसस्थानकात एका 23 वर्षीय तरुणानं गळफास लावून आत्महत्या (Young man commit suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणानं बसस्थानकातील शेडच्या अँगलला कंबरेच्या बेल्टने गळफास लावून आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित तरुणानं वैशाली नावाच्या तरुणीला उद्देशून फरशीवर एक भावनिक सुसाईड नोट (write suicide note on floor) लिहिली आहे. त्यानं लिहिलेली नोट शहरभर चांगलीच चर्चेत होती. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.
अर्जुन विरजी पाडवी असं आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो अक्कलकुवा तालुक्यातील डनेल येथील रहिवासी होता. शुक्रवारी रात्री बसस्थानकात कुणीही नसताना त्यानं कंबरेच्या बेल्टच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत अर्जुनने आत्महत्या करण्यापूर्वी वैशाली नावाच्या तरुणीला उद्देशून अशुद्ध हिंदी भाषेत फरशीवर खडूने काही मजकूर लिहिला आहे. मुलीनं प्रेमभंग केल्यामुळे तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा- व्हॉट्सअॅपवर मुलींचा व्हायचा सौदा मग लॉजवर चालायचं धक्कादायक कृत्य; मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती धडगाव पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली आहे. मृत अर्जुन बाहेरगावावरून मुलीला भेटण्यासाठी आल्यानंतर, त्यांची भेट न झाल्याने अथवा तरुणीनं अपेक्षा भंग केल्याने तरुणानं हे टोकाचं पाऊल उचचलं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा- एकतर्फी प्रेमातून तरुणाचं विकृत कृत्य; अल्पवयीन मुलीसमोर उरला आत्महत्येचा पर्याय, पुण्यातील घटना
संबंधित तरुणाने फरशीवर लिहिलेला मजकूर अशुद्ध हिंदी भाषेत लिहिला आहे. त्यामुळे त्याचा योग्य अर्थ काढणं काहीसं कठीण जात आहे. पण त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. त्यातून तो तिला भेटायला आला होता. पण त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे दोन दिवस काहीही न खाता तो तिची वाट पाहत होता. या काळात त्यानं केवळं पाणी प्यायलं होतं. तसेच आई वडिलांपेक्षाही जास्त आपण तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू वैशाली असंही त्यानं या नोटमध्ये म्हटलं आहे. त्याबरोबर या मजकुराच्या बाजुला हृदयाचा आकार काढून त्यामध्ये इंग्रजी 'v' असं अक्षर लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Suicide