पाटणा, 5 एप्रिल : बिहार (Bihar)मधील त्रिवेणीगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या आईने आपल्या दोन मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच स्वत: देखील आत्महत्या करायला तयार होती. (woman tried to burnt) सुदैवाने मुलांच्या रडण्याचा आवाज आल्याने स्थानिकांना या घटनेबाबत माहित झालं. यानंतर स्थानिकांनी दोनही मुलांना वाचविले. जखमी मुलांना त्रिवेणीगंज येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. ते सुखरुप आहेत. रुबी देवी असे या महिलेचे नाव आहे. ती त्रिवेणीगंज येथील पथरा वार्ड क्रमांक 1 येथे राहते.
म्हणे कर्जामुळे घेतला निर्णय
स्थानिक लोकांनी सांगितले की, त्रिवेणीगंज पथरा वार्ड क्रमांक 1 येथे राहणाऱ्या रुबी देवी ने याआधीदेखील विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुबीचा पती गुलाब साह हा लुधियाना येथे राहतो. तेथे तो मजदूरी करतो. तर तेच दुसरीकडे आपल्या दोन मुलांसह रुबी पथरा येथे राहते. मुलांना जाळणे आणि स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला गेला, याबाबत अजून खुलासा झालेला नाही. महिलेचे म्हणणे आहे की, तिने बँकेकडून 35 हजार रुपयाचे कर्ज काढले होते. ज्याचा हप्ता 1910 रुपये तिला जमा करायचे होते. हाच विचार तिच्या डोक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. यामुळे तिने हा निर्णय घेतला.
केवळ संजय राऊतच नाही तर आपच्या बड्या नेत्यावरही कारवाईचा बडगा, ईडीकडून कोट्यवधींची संपत्ती जप्त
घराच्या मागे खोदला होता खड्डा
दरम्यान, या दोनही मुलांवर उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस तपासाला सुरुवात झाली आहे. या दोन मुलांमध्ये एक मुलगा तर एक मुलगी आहे. या मुलांनी सांगितले की, रात्री अंधार असताना त्यांच्या आईने घराच्या मागे एका खड्डा खोदला. तसेच दोन्ही भाऊ-बहिणीवर तेल टाकले. यानंतर स्वत:वरही तेल टाकले आणि दोन्ही मुलांना आग लावली. स्थानिक लोकांमुळे ही दुर्घटना टळली. या घटनेनंतर या मुलांचे वडील लुधियानावरुन सुपौलसाठी रवाना झाले आहेत. तर मुले आणि त्यांची आई रुबी यांच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेने सांगितले आहे की, मानसिक तणाव आणि कर्जाच्या समस्येमुळे तिने हे पाऊल उचलले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.