Home /News /crime /

मुंबईत गळा चिरून महिलेची निर्घृण हत्या, खूनानंतर आरोपीने सोडला नाही एकही पुरावा

मुंबईत गळा चिरून महिलेची निर्घृण हत्या, खूनानंतर आरोपीने सोडला नाही एकही पुरावा

मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकली नाही.

    मुंबई, 2 जानेवारी : मुंबईतील विद्याविहार इथं सोमवारी एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असल्याने अजूनही या महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांना जेव्हा सोमवारी या महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिचा एका पाय गायब होता. आता एका नाल्यामध्ये हा पायाचा तुकडा सापडला आहे. पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकली नाही. विद्याविहारमधील नवल गेटसमोर सोमवारी एका महिलेचा बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह नजरेस आल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी याबाबतची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली होती. नवऱ्याशी वाद घालून ती आली होती मुंबईत, नोकरीचे आमिष दाखवून वयोवृद्ध व्यक्तीने केला बलात्कार पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसंच नंतर या मृतदेहाचा पंचनामाही करण्यात आला. सध्या पोलीस घाटकोपरमधील विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी झाली. हत्येनंतर आरोपीने हा मृतदेह घाटकोपरमध्ये आणून फेकला. 'रेप नहीं प्यार था मीलॉर्ड..', मूकबधीर आरोपीची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता 'सगळ्यात आधी मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही गायब असणाऱ्या लोकांची यादी तपासून पाहात आहोत,' अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime, Mumbai

    पुढील बातम्या