खळबळजनक! मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील वॉशरुममध्ये अभिनेत्रीसोबत छेडछाड, गुन्हा दाखल

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री एका वेब सीरीजच्या (Web series) चित्रीकरणाच्या (Shooting) निमित्ताने राहत होती.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री एका वेब सीरीजच्या (Web series) चित्रीकरणाच्या (Shooting) निमित्ताने राहत होती.

  • Share this:
    मुंबई, 01 फेब्रुवारी: मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) महिला छेडछाडीची (Women Molestation) घटना समोर आली आहे. पीडित महिला अभिनेत्री असून यावेळी ती हॉटेलमध्ये एका वेब सीरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राहत होती. तिने या वेब सीरीजचं दिवसभरातील चित्रीकरण संपवून कपडे बदलण्यासाठी हॉटेलमधील वॉशरूमध्ये गेली होती. यावेळी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यांने तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं एनएम जोशी मार्गावरील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सदर घटना दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी घडली. यावेळी पीडित हॉटेलच्या 37 व्या मजल्यावरील एका वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली होती. पीडित महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी एका 22 वर्षीय संशयीत आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित महिला तिचं दिवसभरातील चित्रीकरण संपवून वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली होती. यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि आरोपी दिलेश्वर महंत याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने तिला घट्ट पकडून ठेवलं. हे ही वाचा-मुंबईतल्या कन्स्ट्रक्शन साईटवर आढळला मृतदेह, तपासात समोर आली धक्कादायक माहिती या कृत्यानंतर पीडित महिलेनं आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली आणि वॉशरूमच्या बाहेर येवून आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी महंतला हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी आरोपी दिलेश्वर महंत विरोधात लैंगिक अत्याचारासहित भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही.
    Published by:News18 Desk
    First published: