Home /News /crime /

शेजारच्यांचा एकमेकांच्या पत्नीवर बलात्कार; मोबाइलमुळे गूढ उलगडलं

शेजारच्यांचा एकमेकांच्या पत्नीवर बलात्कार; मोबाइलमुळे गूढ उलगडलं

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

हे प्रकरण पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.

  गांधीनगर, 14 मे : गुजरातच्या (Gujrat News) सूरतमधून बलात्काराचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे दोन महिलांनी एकमेकांच्या पतीविरोधात बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही महिला एकमेकांच्या पतीविरोधात पोलिसात गेल्या आहेत. या प्रकरणात सूरतमधील मंगरोल पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरत जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या दोन महिलांनी एकमेकांच्या पतीविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. यामधील  तिसरा आरोपी महिलांच्या पतीचा मित्र आहे.

  पोलिसांकडून कारवाई, आरोपीला अटक... महिलांच्या तक्रारीवर पोलिसांनी पहिल्या महिलेवर एक वर्षांहून अधिक काळ बलात्कार करण्यासाठी 34 वर्षीय सुभाष याला अटक केली आहे. सुभाष शेतात मजुरीचं काम करतो. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जेव्हा घरात कोणी नव्हतं, त्यावेळी सुभाषने बलात्कार केला. पोलिसांनी महिलेला वैद्यकीय तपासासाठी रुग्णालयात पाठवलं आहे.

  हे ही वाचा-पती-पत्नीने नंतर तडजोड केली तरी आमचा आदेश संपत नाही', कोर्टाने असं का म्हटलं?

  तर दुसरीकडे सुभाषच्या पत्नीने महिलेचा पती 33 वर्षीय विनयवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, विनय आणि त्याचा मित्र अतुलने बलात्कार केला आहे.

  पहिली महिलेच्या मोबाइलवर सुभाषने वारंवार केला फोन... शेजारी राहणारा सुभाष महिलेला सतत फोन करत होता. ती घरात नव्हती, फोन मात्र घरीच विसरून गेली होती. ज्यावेळी पतीने तिचा मोबाइल पाहिला, त्यावरील मिस्ड कॉल पाहिल्यानंतर सवाल उपस्थित केला. तेव्हा महिलेने सुभाषसोबत अवैध संबंध असल्याचं सांगितलं.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Gujrat, Rape

  पुढील बातम्या