मुंबई : पती-पत्नीच्या नात्यात भावनिकता आणि रोमान्स या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण एखाद्या नात्यात या गोष्टी नसतील, तर त्याचे काही विपरित परिणामही होऊ शकतात. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पतीबरोबर खूश नसलेली महिला तिच्या दिराच्या प्रेमात पडली आहे.
मुंबईतील एक 32 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत आनंदी नसल्याने तिच्या दिराच्या प्रेमात पडली. तिचे दिराशी शारीरिक संबंधही आहेत. प्रकरण असं आहे की महिलेचं तिच्या संमतीशिवाय लग्न झालं होतं. लग्नानंतर नवरा आपल्यावर अजिबात प्रेम करत नाही, तो अजिबात रोमँटिक नाही. त्यामुळेच दिराशी असलेल्या नात्यात आनंदी असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.
OMG! बाळ नको म्हणून रुग्णालयाच्या शौचालयात केली प्रसुती अन्… घडलं भयानक
महिलेने सांगितलं की, माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या पसंतीचा मुलगा निवडून माझं लग्न लावून दिलं, पण या लग्नात मी अजिबात खूश नाही. फक्त लोकांना सांगण्यासाठीच आम्ही दोघे पती-पत्नी आहोत, या शिवाय आमच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी असं काहीही नाही. भावनिक संबंध नसल्यामुळे आमच्यामध्ये अजिबात रोमान्स होत नाही, त्यामुळे मी या लग्नात अजिबात आनंदी नाही.
पतीच्या चुकीमुळे महिलेचा दिरावर जडला जीव
खरं तर माझं आणि माझ्या दिराचं खूप छान जमतं, आम्ही एकमेकांशी चांगली केमिस्ट्री शेअर करतो. याचं कारण असं की आम्हा दोघांच्याही अनेक गोष्टींबाबत सारख्याच आवडी-निवडी आहेत. पण अडचण अशी आहे की मला त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झाले आहे. एकत्र वेळ घालवताना आम्ही एकमेकांच्या अगदी जवळच आलो नाही तर एकदा आम्ही किसही केला. मला माझ्या दिराच्या जवळ जाण्यात काहीही गैर वाटत नाही. कारण हे जे काही घडलं त्यात माझ्या पतीची चूक आहे.
असे मित्र असण्यापेक्षा.., तिला भेटायला बोलावले अन् 6 जणांनी केला गॅंगरेप
एक्सपर्टने महिलेला दिलेला सल्ला
मुंबई येथील रिलेशनशिप काउन्सेलर रचना अवत्रामणी यांनी महिलेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्या महिलेला विचारलं की, जेव्हा तिच्या पतीला याबद्दल कळेल, तेव्हा तिला कसं वाटेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या दिराशी स्पष्टपणे बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्या दिरापासून दूर राहू शकत नाही, असंही म्हणत आहात. या सर्व गोष्टींचा विचार केला असता तुम्ही एका गंभीर परिस्थितीत अडकत आहात, ज्याचे परिणाम भविष्यात खूप वाईट असू शकतात, असं रचना यांनी त्या महिलेला सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai