मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नांदेड : महिलेला 'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे दिले आमिष अन् भामटा दागिने घेऊन फरार

नांदेड : महिलेला 'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे दिले आमिष अन् भामटा दागिने घेऊन फरार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नांदेडमधून लकी ड्रॉच्या नावावर एक धक्कादायक प्रकार घडला. धानोरा येथील अंजली हनुमंतराव लामेंगे या 12 ऑगस्टला बिंदू महाविद्यालयासमोर थांबलेल्या होत्या.

  • Published by:  News18 Desk
नांदेड, 17 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातून 'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याच्या नावावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला आमिष देत तिचे दागिने पळवण्यात आले आहे. या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - एका महिलेला सांगण्यात आले होते की, तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉमध्ये बक्षिस लागले आहे. याप्रकारचे या महिलेला दाखवण्यात आले आणि जवळील दागिने वजन करण्यासाठी घेतलेल्या आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना 12 ऑगस्टला भोकर शहरातील बिंदू कॉलेज परिसरात घडली. अंजली हनुमंतराव लामेंगे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यात एका महिलेला केएफसीची फ्रँचायजी देतो, या नावाने तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता नांदेडमधून लकी ड्रॉच्या नावावर एक धक्कादायक प्रकार घडला. धानोरा येथील अंजली हनुमंतराव लामेंगे या 12 ऑगस्टला बिंदू महाविद्यालयासमोर थांबलेल्या होत्या. यावेळी अनोळखी एक जण त्यांच्याजवळ आला. यावेळी तो अंजली यांना म्हणाला की, तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉमध्ये बक्षिस लागले आहे. तसेच त्याच्या या सांगण्यावर अंजली यांनी विश्वास ठेवला. तसेच तो म्हणाला, वजन करण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत. यानंतर अंजली यांनी त्यांच्या जवळील 1 लाख 31 हजार रुपयांचे दागिने काढून दिले़. मात्र, यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. यावेळी अंजली लामेंगे यांनी आरडाओरडा केला. हेही वाचा - मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात, पुण्यात लग्नाचे आमिष देऊन घटस्फोटित महिलेवर बलात्कार मात्र, काहीच फायदा झाला नाही आणि तो भामटा तेथून फरार झाला. यानंतर याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Nanded

पुढील बातम्या