Home /News /crime /

पतीच्या हत्येसाठी ऑनलाईन वेबसाईटवरुन बुक केला 'किलर'; महिलेसोबत पुढे घडलं भलतंच

पतीच्या हत्येसाठी ऑनलाईन वेबसाईटवरुन बुक केला 'किलर'; महिलेसोबत पुढे घडलं भलतंच

52 वर्षाच्या वेंडी वेनला आपल्या पूर्व पतीची हत्या करायची होती. यासाठी ती एका हिटमॅनच्या शोधात होती.

    नवी दिल्ली 24 नोव्हेंबर : इंटरनेटचं जग अतिशय विचित्र आहे. इथे अशा गोष्टी मिळतात ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल. एका क्लिकवर इथे तुम्हाला पेन्सिलने चित्र बनवायलाही शिकवलं जातं आणि बॉम्ब बनवायलाही. इंटरनेटवर काम करण्यासाठी कर्मचारीही मिळतात आणि हत्यारेदेखील (Hire Hitman from Internet) . कदाचित तुम्ही हे ऐकून शॉक झाले असाल की इंटरनेटवर हत्यारे कसे मिळू शकतात. नुकतंच एका महिलेनं इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या पूर्व पतीच्या हत्येसाठी हत्यारा बूक करायला एका वेबसाईटची (Woman hire hitman from website) मदत घेतली. मात्र हा डाव तिच्यावर उलटा पडला. अमेरिकेच्या मिशिगनमधील रहिवासी असलेली 52 वर्षाच्या वेंडी वेनला आपल्या पूर्व पतीची हत्या करायची होती. यासाठी ती एका हिटमॅनच्या शोधात होती. इंटरनेंटवर भरपूर शोध घेतल्यानंतर तिला RentAHitman.com नावाची एक वेबसाईट मिळाली. वेंडीला असं वाटलं की ही वेबसाईट ऑनलाईन हत्या करणारे लोक पुरवते. यासाठी तिने वेबसाईटला संपर्क साधला. मात्र तिची चोरी पकडली गेली आणि तिच्याविरोधात केस सुरू झाली. आता तिला कमीत कमी ९ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की महिलेचा हा डाव उघडकीस कसा आळा. तर असं झालं की रेंट अ हिटमॅन ही साईट हत्यारे नाही तर गुप्तहेरांचा पुरवठा करते. ज्या लोकांना आपल्या पार्टनरवर किंवा इतर कोणावर नजर ठेवायची आहे ते लोक या वेबसाईटवरुन लोकांना हायर करतात. वेबसाईटमध्ये काम करणारे लोक स्वतःला हिटमॅन म्हणतात कारण ते लोकांची गुपितं शोधतात. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या बॉब इन्सने ही वेबसाईट 2005 मध्ये रजिस्टर केली होती. तेव्हा त्यांना असं वाटलं नव्हतं की त्यांच्या वेबसाईटची डिमांड लोकांमध्ये इतकी जास्त वाढेल. मात्र लोक वेबसाईटचं नाव वाचून गोंधळतात. बॉबला अनेकदा असे मेल आले आहेत ज्यात लोकांनी त्यांना हत्या करण्यासाठी विचारणा केली. बॉबचं असं म्हणणं आहे की ते कायद्याचं पालन करतात आणि हत्येसारखा टोकाचा विचार करणाऱ्या व्यक्तींना कायद्याच्या हवाली करतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या