Home /News /crime /

प्रेमविवाहानंतर गर्भपात न केल्यानं महिलेवर अत्याचार; पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रेमविवाहानंतर गर्भपात न केल्यानं महिलेवर अत्याचार; पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Crime in Aurangabad: प्रेमविवाह (Love marriage) केल्यानंतर इच्छा नसतानाही वारंवार पत्नीला गर्भपात (force to abortion) करण्यासाठी बळजबरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    औरंगाबाद, 22 मे: प्रेमविवाह (Love marriage) केल्यानंतर इच्छा नसतानाही वारंवार पत्नीला गर्भपात (force to abortion) करण्यासाठी बळजबरी केल्याची संतापजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. आरोपी पतीनं यापूर्वी दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलं होतं. यानंतर तिसऱ्या वेळीही आरोपीनं गर्भपात करण्याचा  तगादा लावला. पण यावेळी पीडित महिलेनं गर्भपातास नकार दिल्यानं पतीनं तिला मारहाण करून घराबाहेर काढलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं आरोपी पतीविरोधात कौटुंबीक हिंसाचारासोबत (Domestic violence case) मनाविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित आरोपी पतीचं नाव आशिष गोरे असून त्याचे 2007 पासून पीडित महिलेशी प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात आरोपी आशिषनं लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. पण आरोपी आशिषनं तिला गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडलं. अशाप्रकारची घटना तिच्यासोबत दोन वेळा घडली. त्यामुळे पीडितेनं पोलिसांत जाण्याची धमकी दिली. यामुळे आरोपी आशिषनं पीडितेशी नोंदणी पद्धतीनं 2018 मध्ये लग्न केलं. हे वाचा-झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताचा संशय लग्नानंतर आता तुला बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही, असं म्हणत आरोपीनं पीडितेवर गर्भपात करण्यासाठी तगादा लावला. गर्भपात करण्यास नकार दिल्यानं आरोपी पतीनं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर घरी नेलं नाही आणि मारहाण करून नांदवण्यासही नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेनं आरोपी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा-फेरे घेतल्यानंतर मंडपातून अचानक गायब झाली नवरी, सत्य समजल्यावर सगळेच हैराण या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आशिष गोरे याला अटक केली आहे. कौटुंबीक हिंसाचार आणि बलात्कारासह अन्य कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Love, Rape, Wife and husband

    पुढील बातम्या