मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पाळीव कुत्रा चावला म्हणून महिलेला 6 महिन्याची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड!

पाळीव कुत्रा चावला म्हणून महिलेला 6 महिन्याची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड!

मोबदल्याची रक्कम पीडित मुलाच्या आईला नुकसान भरपाई स्वरुपात देण्याचे आदेश देण्यात आले.

मोबदल्याची रक्कम पीडित मुलाच्या आईला नुकसान भरपाई स्वरुपात देण्याचे आदेश देण्यात आले.

मोबदल्याची रक्कम पीडित मुलाच्या आईला नुकसान भरपाई स्वरुपात देण्याचे आदेश देण्यात आले.

नागपूर, 17 मार्च : पाळीव कुत्रा (pet dog) चावल्याचे सिद्ध झाल्यामुळे मालक महिलेस सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेचा निर्णय नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या (Nandanvan Police Station) हद्दीत एका नऊ वर्षीय मुलाला दोन कुत्र्यांनी चावा घेत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणाच्या खटल्यात हा निर्णय आला. तसंच  50 हजारांचा मोबदला नुकसान भरपाई स्वरुपात देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.

नागपुरात 2014 मध्ये एका नऊ वर्षीय मुलाला पाळीव कुत्रा चावला होता. याप्रकरणी खटल्यात नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निकाल दिला. कुत्र्याची मालक असलेल्या महिलेला याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाळीव कुत्रा चावल्याने मालक महिलेस सहा महिने तुरुंगवास तसंच 50 हजारांचा मोबदला देण्याचा निर्णय दिला.

पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्र्यांची आज बैठक, नव्या निर्बंधासह होणार मोठे निर्णय

मोबदल्याची रक्कम पीडित मुलाच्या आईला नुकसान भरपाई स्वरुपात देण्याचे आदेश देण्यात आले. डॉ. संगीता बालकोटे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या  महिलेचे नाव आहे.  नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत 29 जून 2014  रोजी श्रीकृष्ण नगरात ही घटना घडली होती. फिर्यादी सोनल बदकुले यांचा 9 वर्षीय मुलगा घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. यावेळी बालकोटे यांचा पाळीव कुत्रा व अन्य एक कुत्रा त्यांच्या मुलाला चावला. या दोन्ही कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळं मुलाला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी सोनल यांनी नंदनवन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आरोपी संगीता यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे नमूद करीत त्यांना दोषी ठरविले. त्यांना सहा महिन्याच्या कारावासाची आणि 50 हजार रुपयांच्या  पीडित मुलाची आई आणि याप्रकरणातील फिर्यादी सोनल यांना नुकसान भरपाईच्या स्वरुपात दिली जावी, असे आदेश  दिले.

दीर-भावजयी रस्त्यावर पित होते दारू, पोलिसांनी हटकले तर पकडली कॉलर

या निकलानंतर तुमच्याकडे पाळीव कुत्रा असेल तर काळजी घ्यायला पाहिजे. कारण, तुमचा कुत्रा जर दुसऱ्याला चावला व त्यात तुमचा निष्काळजीपणा सिद्ध झाला तर तुमच्यावर ही वेळ येऊन शकते त्यामुळे काळजी घ्या.

First published:

Tags: Crime, Maharashtra, नागपूर