Home /News /crime /

भाचा-भाचीचा मृतदेह कारमध्ये ठेवून महिनोन महिने फिरत राहिली महिला

भाचा-भाचीचा मृतदेह कारमध्ये ठेवून महिनोन महिने फिरत राहिली महिला

महिलेला 7 वर्षांचा भाचा आणि 5 वर्षांची भाची होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

    वॉशिंग्टन, 31 जुलै : अमेरिकेतील (America) एका महिलेला आपला 7 वर्षांचा भाचा आणि 5 वर्षांची भाची या दोघांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या महिलेने दोघांचे मृतदेह आपल्या गाडीत ठेवले होते. काही दिवस नाही तर अनेक महिने या दोघांचा मृतदेह गाडीमध्ये होता. हा धक्कादायक प्रकार मॅरीलँड येथील बालतिमोर काउंटी येथील आहे. (The woman Roaming around for months carrying the body of her niece and nephew in the car) पोलिसांच्या प्रवक्त्याने शुक्रवारी याबाबत सांगितलं की, निकोल जॉनसन 33 वर्षांची आहे. भाचा-भाची गायब होण्यामागे तिचा हात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे बुधवारी साधारण रात्री 11 वाजता पोलिसांनी महिलेची कार एसेक्स भागातील रस्त्यावर थांबवली. आणि गाडीचा तपास सुरू केला. त्यानंतर जे काही दिसलं ते पाहून पोलिसांना धक्काच बसला. या महिलेच्या गाडीत जॉशलिन जॉन्सन (7) आणि लॅरी ओ'नील (5) या दोघांचे मृतदेह सापडले. दोघांचे मृतदेह तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. पोस्ट मार्टम झाल्यानंतर दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल, असं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीची आत्महत्या फर्स्ट डिग्री बाल शोषणाचा गुन्हा निकोल जॉन्सनवर बाल शोषण आणि लहान मुलांचा जीव घेणे यासह अनेक प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार आहे. बालतिमोर काउंटीच्या पोलीस प्रमुखांनी हा मोठा अपराध असल्याचं सांगितलं. अद्याप महिलेने आपली भाची आणि भाच्याची हत्या का केली, यामागील कारण समोर आलेलं नाही. मात्र ही घटना पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेत घडलेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना आधीपासून महिलेवर संशय होता. मात्र महिलेने स्वत:च्याच भाचा-भाचीची हत्या का केली, यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र अशा प्रकारे मृतदेह कारमध्ये ठेवलं मोठी भयावह बाब असून तिच्यावर बाल शोषणाअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Death, Murder

    पुढील बातम्या