Home /News /crime /

महिलेने रचना पतीच्या हत्येचा कट; तलवारीने वार करीत डोकं केलं धडापासून वेगळं

महिलेने रचना पतीच्या हत्येचा कट; तलवारीने वार करीत डोकं केलं धडापासून वेगळं

महिलेने पतीच्या शरीराचे तुकडे करीत ते विहिरीत फेकून दिले, आणि डोकं प्लास्टिकच्या पिशवीत भरलं आणि..

    धनबाद, 7 सप्टेंबर : Chandrakant Tudu murder case या प्रकरणात एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येअतंर्गत पोलिसांनी चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिला अटक केली आहे. ज्या तलवारीने चंद्रकांत यांची हत्या करण्यात आली होती, ते हत्यार ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान मालतीदेवीने आपला गुन्हा कबूल केला आहे.  विहिरीत सापडलं तुकडे केलेलं शरीर सिटी एसपी आर रामकुमार यांनी सांगितले की 28 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रकांत टुडू याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला. चंद्रकांत याची पत्नी मालती देवीने 27 ऑगस्ट रोजी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस चंद्रकांतचा तपास करीत असताना घराच्या मागे विहिरीत त्याचं मृतदेह तीन भागात कापलेल्या अवस्थेत दिसला, यावेळी मृतकाचे धड आणि पायचं मिळाले होते. मृतकाचे डोके सापडले नव्हते. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या तपासादरम्यान चंद्रकांत याची पत्नी मालती देवी हिच्याविरोधात बऱ्याच गोष्टी दिसून येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी मालतीला ताब्यात घेत तपास सुरू केला. पहिल्यांदा मालतीने आपण गुन्हा केल्याचा नकार दिला, मात्र कालांतराने तिने आपणच हत्या केल्याची कबुली दिली. पुढे मालती म्हणाली की, तिची तीन मुलं आहेत. पती मुंबईत मजुराचे काम करीत होता. या वर्षी जानेवारी महिन्यात तो मुंबईहून परतला होता. त्यामुळे मुलांचा सांभाळ करणं तिला कठीण जात होतं. ती दारुची विक्री करीत होती. त्यामुळे तिच्या घरात बरेच लोक येऊ लागले. मात्र पतीला हे आवडत नव्हतं, त्यामुळे तो सतत पत्नीसोबत वाद करीत होता. याच त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला. त्या दिवशी चंद्रकांत मित्रांसोबत घराच्या अंगणात बसून दारू पित होता. रात्री 9 वाजता ती मुलांना झोपवून पतीच्या खोलीत गेली. यादरन्यान धारदार तलवारीने तिने पतीच्या मानेवर जोरदार वार केला. मान धडापासून वेगळं झालं. त्यानंतर तिने शरीराचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तिला शक्य झालं नाही. तिने गुडघ्यावर वार केले, मात्र पाय कापला गेला नाही. त्यानंतर तिने मृतदेहाच्या कमरेवर वार केले आहे धडाचे दोन तुकडे केले. जागरणने यासंदर्भातील वृत्त केलं आहे. मालतीने हत्या केल्यानंतर रात्री 12 वाजता त्याचे धड टोपलीत भरले आणि घरामागे असलेल्या विहिरीत फेकून दिले. तलवारही दुसऱ्या विहिरीत फेकून दिली. त्यानंतर तिने घराची साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी पतीचं डोकं एका प्लास्टिकच्या पिशवीत भरुन स्कूटीच्या डिक्कीत ठेवून लांब फेकून आली. पोलिसांना तपासादरम्यान ही स्कूली सापडली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या