मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Golden Retriever साठी ऑनलाइन भरले 66 लाख; कुत्रा मिळाला नाहीच अन्..

Golden Retriever साठी ऑनलाइन भरले 66 लाख; कुत्रा मिळाला नाहीच अन्..

गोल्डन रिट्रिव्हर जातीच्या कुत्र्यासाठी 66 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले, पण कुत्रा मिळालाच नाही.

गोल्डन रिट्रिव्हर जातीच्या कुत्र्यासाठी 66 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले, पण कुत्रा मिळालाच नाही.

Cyber Crime: मुलीच्या वाढदिवसाला भेट द्यायचा म्हणून परदेशी कुत्र्याचं पिल्लू तिने खरेदी करायचं ठरवलं. त्यासाठी ऑनलाइन 66 लाख रुपये ट्रान्सफरही केले. पण ऑनलाइन व्यवहारात फसवणूक झाली. उत्तराखंड, त्रिपुरापासून महाराष्ट्रापर्यंतच्या खात्यात जमा केलेले पैसे बंगळुरूच्या ATM मुळे कसे मिळाले वाचा...

पुढे वाचा ...
बंगळुरू, 26 ऑगस्ट: आजकाल ऑनलाइन शॉपिंगची (Online Shopping) क्रेझ वाढली आहे. अगदी टाचणीपासून गाडीपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन उपलब्ध असतात. एवढेच नव्हे तर झाडं, प्राणी, पक्षीही आता ऑनलाइन खरेदी करता येतात. लोकही अगदी बिनधास्तपणे अशा गोष्टींची ऑनलाइन खरेदी करत असतात. याचाच फायदा सायबर गुन्हेगारही घेतात. बनावट वेबसाइट (Fake Website) बनवून लोकांची फसवणूक करत असतात. लाखो, कोट्यवधी रुपयांना गंडा घालतात. नुकतीच अशीच एक घटना उत्तराखंडमधील देहराडून इथं उघडकीस आली असून, परदेशी जातीचा कुत्रा विकण्याच्या (International Breed Dogs) नावाखाली बेंगळुरू इथल्या सायबर गुन्हेगारानं डेहराडूनच्या एका महिलेला तब्बल 66 लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी देहराडून एसटीएफने बंगळूरू इथं बॉबी इब्राहीम नावाच्या एका सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे. देहराडून सायबर क्राईम पोलिसांकडे आरती रावत नावाच्या एका महिलेनं काही दिवसांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली. आरती रावत यांनी आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसाची भेट (Doggy Birthday Gift) म्हणून एका वेबसाइटवरून गोल्डन रिट्रीव्हर (Golden Retriever Price) या परदेशी जातीच्या कुत्र्याची खरेदी केली होती. त्यांनी ऑर्डर दिल्यावर संबधित वेबसाइटकडून कुत्रं पाठविण्याचा वाहतूक खर्च, विमा अशा वेगवेगळ्या कारणांसाठी रावत यांच्याकडून तब्बल 66 लाख 39 हजार 600 रुपये उकळले. मात्र कुत्रा पाठवलाच नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रावत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गे-लेस्बियन्सना शोधून तालिबान सर्वांसमोर देणार क्रूर शिक्षा; वाचूनही उडेल थरकाप या प्रकरणाचा तपास करताना, ही बनावट वेबसाइट असून ती  बेंगळूरू इथून चालवली जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि देहराडून एसटीएफचे अधिकारी बेंगळुरू इथं पोहोचले आणि त्यांनी बॉबी इब्राहीम (bobby Ibrahim) नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. बॉबी इब्राहीम कॅमेरून (Cameroon) या आफ्रिकन देशाचा (African Country) नागरिक असून, सध्या त्याचं वास्तव्य बेंगळूरू इथं होतं. त्यानं या वेबसाइटच्या माध्यमातून परदेशी जातीचे कुत्रे घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक लोकांकडून हजारो रुपये घेऊन त्यांना लुबाडले आहे. वेगवगेळ्या राज्यांमधील बँकांमध्ये खाती उघडून तिथं पैसे मागवले जात असत आणि नंतर बेंगळुरूमधील एटीएमवरून (ATM) काढले जात. एटीएमवरून पैसे काढण्याची चूकच आरोपीला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी कारणीभूत ठरली. पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार आरती रावत यांच्याकडून त्यानं त्रिपुरा (Tripura) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध खात्यांमध्ये पैसे मागवले होते आणि बेंगळुरूमधील एका एटीएमवरून तो ते पैसे काढत असे. त्या आधारे तपास करत एसटीएफची टीम त्या एटीएमपर्यंत पोहोचली. 15 दिवस सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून त्यांनी आरोपी बॉबी इब्राहीमचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 4 मोबाइल, 1 लपटॉप, 5 सिमकार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 36 हजार 620 रुपये जप्त केले. तसंच 13 लाख रुपये असलेलं एक बँक खातंही गोठवलं आहे.
First published:

Tags: Cyber crime, Dog

पुढील बातम्या