मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शिकवणीला गेली तर परतलीच नाही! पुन्हा एकदा श्रद्धासारखं हत्याकांड, जम्मू-काश्मीर हादरलं

शिकवणीला गेली तर परतलीच नाही! पुन्हा एकदा श्रद्धासारखं हत्याकांड, जम्मू-काश्मीर हादरलं

संपादित छायाचित्र

संपादित छायाचित्र

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात एका महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

श्रीनगर, 12 मार्च : देशभरात खळबळ माजवणाऱ्या श्रद्धा मर्डर प्रकरणानंतर देशाच्या विविध भागातून अशीच अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच निक्की यादव हत्याकांडातही आरोपीने प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये देखील महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले होते. या घटना ताज्या असतानाच जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात एका महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांच्या अंगावर काटा आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे.

एका पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी मध्य काश्मीरमधील सोईबाग पोलीस चौकीला तनवीर अहमद खानकडून एक तक्रार आली, ज्यामध्ये त्याने सांगितले की, 7 मार्च रोजी त्याची बहीण कोचिंगसाठी घराबाहेर पडली ती परतलीच नाही. प्रवक्त्याने सांगितले की, अर्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मोहनपोरा बडगाम येथील रहिवासी शब्बीर अहमद वानीसह अनेक संशयितांना ताब्यात घेतले.

वाचा - चोरी लवपण्यासाठी फिनेल प्याला; नंतर मालकीणीवर घेतला आरोप; नोकराच्या प्रताप

कसून चौकशी केल्यानंतर अहमदने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. पोलिसांनी सांगितले की, अहमदच्या खुलाशानंतर मृतदेहाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. सध्या वैद्यकीय-कायदेशीर औपचारिकता सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

छत्तीसगडमधये पत्नीची हत्या

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये सती साहू नावाच्या महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवल्याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती पवनसिंह ठाकूर याला अटक केली आहे. दोघांनी 10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्याला दोन मुलेही आहेत. ठाकूर याच्यावर बनावट नोटा छापल्याचाही आरोप आहे.

First published:
top videos

    Tags: Jammu and kashmir