मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दुसरा मित्र असल्याचा बॉयफ्रेंडला राग, कात्रीने घेतला महिलेचा जीव

दुसरा मित्र असल्याचा बॉयफ्रेंडला राग, कात्रीने घेतला महिलेचा जीव

आपल्या गर्लफ्रेंडला (woman murdered by her boyfriend in extra marital affair case) मित्र असल्याचा राग आल्यामुळे झालेल्या भांडणात प्रियकराने महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

आपल्या गर्लफ्रेंडला (woman murdered by her boyfriend in extra marital affair case) मित्र असल्याचा राग आल्यामुळे झालेल्या भांडणात प्रियकराने महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

आपल्या गर्लफ्रेंडला (woman murdered by her boyfriend in extra marital affair case) मित्र असल्याचा राग आल्यामुळे झालेल्या भांडणात प्रियकराने महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: आपल्या गर्लफ्रेंडला (woman murdered by her boyfriend in extra marital affair case) मित्र असल्याचा राग आल्यामुळे झालेल्या भांडणात प्रियकराने महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणाचे (Physical relations) महिलेसोबत शारीरिक संबंध होते. मात्र महिलेचे आणखी एका व्यक्तीसोबत संबंध (Murder over doubt) असल्याच्या संशयावरून दोघांमधील संबंध ताणले गेले होते. त्यातून झालेल्या वादानं टोक गाठल्यामुळे बॉयफ्रेंडनं महिलेचा थेट खूनच केल्याचं उघड झालं आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील ओखला परिसरात राहणाऱ्या 37 वर्षांच्या झरना नावाच्या महिलेचं 26 वर्षांच्या आलम नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. काही वर्षांपूर्वी एका कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून ते दोघे एकत्र राहत होते आणि लग्न करण्याचा विचार करत होते. आलम हा झरनाला दरमहा 6 हजार रुपये खर्चासाठी देत होता आणि त्यात ही महिला गुजराण करत होती.

दुसऱ्या मित्राचा शोध

झरनाला आपल्याशिवाय आणखी एक मित्र असल्याचा शोध आलमला लागला आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्यानंतर त्याने झरनाला पैसे देणं बंद केलं. या मुद्द्यावरून दोघांची सतत भांडणंही होत असत. झरनाला धडा शिकवण्याचा निर्णय आलमने घेतला आणि तिच्या खुनाचा कट आखला.

सुनसान क्वार्टरमध्ये केला खून

घटनेच्या दिवशी आलम हा झरनाचा एका सुनसान क्वार्टरमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी याच विषयावरून दोघांमध्ये भांडणं झाली. रागाच्या भरात आलमनं झरनाच्या पर्समधील कात्री घेऊन तिच्यावर जीवघेणे वार केले. गळ्यावर हल्ला झाल्यामुळे झरनाचा मृत्यू झाला. पुरावे मिटवण्यासाठी आलमनं तिचा मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅगेत भरून टाकून दिला आणि पुरावे मिटवण्यासाठी कात्रीदेखील नाल्यात फेकून दिली.

हे वाचा- मामाच्या घरी राहणाऱ्या मुलीसोबत घडलं विपरीत; कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेली अन

पोलिसांनी लावला छडा

पोलिसांनी झरनाचा मोबाईल आणि सिमकार्डवरून तपास केला. आदल्या रात्री आलमसोबत ती असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर आलमला अटक करून पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं खुनाची कबुली देत आरोप मान्य केला. आलम आणि झरना या दोघांचंही लग्न झालं असून त्यांनी एकमेकांपासून माहिती लपवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी आलमवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Crime, Delhi, Girlfriend, Murder, Police