हैदराबाद, 14 मार्च : आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर येत आहे. एका महिलेवर स्वत:च्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोठ्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिच्या 17 वर्षांच्या धाकट्या मुलीने याबाबत तक्रार दाखल केली होती. आत्महत्या केलेल्या महिलेच्या आईचे एका पुरूषाबरोबर विवाहबाह्य संबंध होते. ती या मुलीच्या वडिलांपासून विभक्त झाली होती. आरोपी महिलेवर भादवी कलम 306 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींच्या तक्रारीनुसार,तिची आई अनिता आणि पेराम नवीन कुमार या दोघांचे विवाह्यबाह्य संबध होते. त्या मुलीचा असा दावा आहे की तो नेहमी त्यांच्या घरी जायचा.
(हे वाचा-धक्कादायक! प्रेयसीला खूश करण्यासाठी त्यानं 6 महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळलं)
हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेनंतर परिसरात अत्यंत तणावाचं वातारण आहे. कुणाला संशय येऊ नये आणि त्या दोघांनाही त्यांचं प्रेमप्रकरण सुरू ठेवता यावं याकरता या निष्ठूर आईने मोठ्या मुलीचं लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिलं. लग्नानंतर काही दिवसातच मुलीच्या लक्षात आलं की तिच्या आईचं आणि नवऱ्याचं अफेअर आहे. या धक्क्यातून न सावऱ्यालामुळे मुलीने तिने गळफास घेऊन तिचं जीवन संपवलं, असा दावा तिच्या लहान बहिणीने केला आहे. मीरपेट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे.
(हे वाचा-गणिताचा पेपर कठीण गेल्याने जळगावात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या)
मृतक महिला हैदराबाद येथील महाविद्यालयात शिकत होती. तक्रारदार मुलीने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिच्या बहिणचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याचं आईबरोबरच प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तिच्या मृत बहिणीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पतीचं घर सोडण्याची धमकी दिली होती. यावर तिच्या आईने तिला उलट धमकी देत सांगितलं होतं की, जर तिने घर सोडलं तर ती स्वत:च आयुष्य संपवेल.
(हे वाचा-नवऱ्याने केला Lesbian संबंधाला विरोध, गर्लफ्रेंडच्या मदतीनेच त्याचा गळा घोटला)
या प्रकरणावरून मृत महिला आणि तिच्या नवऱ्यामध्ये वारंवार भांडणं होत होती. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास तिने एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. साडीच्या मदतीने बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून तिचे आयुष्य संपवले. तिने लिहिलेल्या चिठ्ठीतून न्यायाची मागणी केली आहे. आरोपींना योग्य शिक्षा व्हावी अशी मागणी या मुलीने केली आहे. दरम्यान पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.