Home /News /crime /

आधी प्रेमाचं नाटक मग पाठित खंजीर; श्रीमंत व्यावसायिकाचे अश्लील व्हिडीओ बनवून केली कोट्यवधींची मागणी

आधी प्रेमाचं नाटक मग पाठित खंजीर; श्रीमंत व्यावसायिकाचे अश्लील व्हिडीओ बनवून केली कोट्यवधींची मागणी

File Photo

File Photo

Honeytrap in Ahmednagar: अहमदनगरमध्ये एका महिलेनं श्रीमंत व्यावसायिकाला (Rich businessmen) प्रेमाच्या (Love) जाळ्यात ओढून शरीरसंबंध (Sexual relation) ठेवण्यास भाग पाडलं आहे. यानंतर अश्लील व्हिडीओ बनवून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली आहे.

पुढे वाचा ...
    अहमदनगर, 16 मे: अहमदनगरमध्ये एका श्रीमंत व्यवसायिकाला (Rich businessmen) प्रेमाच्या (Love) जाळ्यात ओढून शरीरसंबंध (Sexual relation) ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे, तर आरोपींनी संबंधित व्यावसायिकाचे अश्लील व्हिडीओ (Pornographic videos) काढून व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral video) देत तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी (Demand 1 crore) मागितली आहे. शिवाय आरोपींनी पीडित व्यवसायिकाला मारहाणही केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची काही दिवसांपूर्वी संबंधित व्यावसायिकाशी ओळख झाली होती. यानंतर यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण आरोपी महिलेनं प्रेमाच नाटक करत फिर्यादी व्यवसायिकाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यानं तिनं पीडित व्यवसायिकाचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत, 1 कोटींची मागणी केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरचं थांबलं नाही, तर आरोपी महिलेनं आपल्या साथीदाराच्या मदतीनं पीडित व्यवसायिकाला मारहाण केली आणि त्याच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्याचबरोबर 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 84 हजार रुपये रोख रक्कमही जबरदस्तीनं हिसकावून घेतली. याप्रकरणी पीडित व्यवसायिकानं आपल्या तक्रारीत म्हटलं की, आरोपी महिलेनं आणि तिच्या साथीदारानं आतापर्यंत एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटला आहे. (वाचा-35 वर्षांच्या लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, संस्थांकडून शोध सुरू) फिर्यादीच्या तक्रारीनंतर अहमदनगर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिच्या आरोपीला अटक केली आहे. अमोल सुरेश मोरे असं अटक केलेल्या महिलेच्या साथीदाराचं नाव आहे. या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहे. यापूर्वी नगरमध्ये हनी ट्रॅपींगच्या घटना समोर आल्या होत्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar News, Love, Money fraud

    पुढील बातम्या