Home /News /crime /

दीरावर जडलं प्रेम; औरंगाबादेतील महिलेनं 2 लाखाची सुपारी देत पतीचा काढला काटा

दीरावर जडलं प्रेम; औरंगाबादेतील महिलेनं 2 लाखाची सुपारी देत पतीचा काढला काटा

Murder in Aurangabad: चुलत दीरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात (Immoral relation) अडसर ठरणाऱ्या पतीची महिलेनं सुपारी देऊन हत्या (Husband Murder) घडवून आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 12 तासांत हत्येचं गुढ उलगडलं आहे.

    पैठण, 22 मे: चुलत दीरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात (Immoral relation) अडसर ठरणाऱ्या पतीची सुपारी देऊन हत्या (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक याठिकाणी घडली आहे. आरोपी पत्नीचे तिच्या चुलत दीरासोबत अनैतिक संबंध सुरू होते. ही बाब पतीला कळाल्यानंतर महिलेनं आपल्या बहिणीच्या मदतीनं 2 लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत हत्येचा उलगडा केला असून आरोपी पत्नीसह अन्य तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 50 वर्षीय हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अशोक बाबासाहेब जाधव असं असून ते कडेठाण बुद्रुक येथील रहिवासी आहेत. मृताची पत्नी रंजना अशोक जाधव हिचे मागील काही दिवसांपासून चुलत दीर रामाप्रसाद शिवाजी जाधव याच्यासोबत अनैतिक संबंध सुरू होते. एकेदिवशी मृत पतीनं आरोपी पत्नीचा मोबाइल चेक केला असता, तिच्या फोनमध्ये चुलत दीर रामाप्रसाद याच्यासोबत अश्लील बातचित केल्याचे फोन रेकॉर्ड आढळून आले. यामुळे रंजना आणि अशोक यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. आपला भांडाफोड झाल्याचं लक्षात आल्यानंतर, आरोपी महिलेनं बहिण मीनाबाई मन्साराम पठाडे हिला फोन करून अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याची माहिती दिली. तसेच पतीच्या हत्या घडवून आणण्याची बातचितही केली. त्याचबरोबर पतीची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेनं आपल्या बहिणीच्या ओळखीच्या लोकांना 2 लाखांची सुपारी दिली. मीनाबाईच्या ओळखीतील संतोष सारंगधर पवार याच्या मदतीनं अशोक यांचा खून करण्यात आला आहे. हे ही वाचा-बुलडाणा हादरलं! उशीनं तोंड दाबून पत्नीची केली हत्या; आरोपी पतीला अटक आरोपींनी मृत अशोक यांना सोमठाणा येथील रेणुका देवी मंदिराच्या डोंगरावर नेऊन त्याठिकाणी हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह थापटी तांडा परिसरात फेकून दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली आणि अवघ्या 12 तासांत हत्येचं गुढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी रंजना अशोक जाधव, रामाप्रसाद उर्फ बाळू शिवाजी जाधव, मीनाबाई मन्साराम पठाडे आणि संतोष सारंगधर पवार या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Murder, Wife and husband

    पुढील बातम्या