• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • निर्दय! प्रियकरासोबत गेली होती पळून, सासरी परतण्यासाठी दिला पोटच्या मुलांचा बळी

निर्दय! प्रियकरासोबत गेली होती पळून, सासरी परतण्यासाठी दिला पोटच्या मुलांचा बळी

प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने त्याच्यापासून झालेल्या (women killed her twins born from boyfriend) दोन मुलांचा बळी दिल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

 • Share this:
  धर्मशाला, 19 सप्टेंबर : प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने त्याच्यापासून झालेल्या (women killed her twins born from boyfriend) दोन मुलांचा बळी दिल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. वर्षभरापूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेल्या या महिलेला सासरी (Woman wanted to return to in laws) परत जायचे  होते. त्यासाठी आपली मुले अडथळा ठरतील असं वाटल्यामुळं तिनं हा निर्णय घेतला. प्रियकरासोबत गेली होती पळून हिमाचल प्रदेशातील मंडी भागात राहणारी 35 वर्षीय महिला मागच्या वर्षी तिच्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. प्रियकरासोबत वर्षभर राहिलेल्या या महिलेला जुळी मुलं झाली. त्यानंतर प्रियकरानं या महिलेला गुंगारा दिला आणि तो गायब झाला. दोन मुलं पदरात पडलेल्या या महिलेला पुढे काय करावं, हे सुचेना. अखेर तिने सासरी परतण्याचा निर्णय घेतला. मुलांना टाकले दरीत आपल्याला मुलं झाल्याचं समजलं, तर सासरची मंडळी आपल्याला स्विकारणार नाहीत, अशी भीती वाटल्याने आपल्या मुलांपासून सुटका करून घेण्याचा निर्णय तिने घेतला. तीन महिन्यांच्या आपल्या दोन मुलांना या महिलेने थेट दरीत फेकून दिले. या मुलांनी अद्याप डोळे उघडून हे जगदेखील नीट पाहिलं नव्हतं. काहीही दोष नसताना या निष्पाप जिवांच्या आयुष्याची यात्रा त्यांच्याच निर्दयी आईने संपवली. त्यानंतर ही महिला तिच्या सासरी परतली. हे वाचा - काठी बघून उधळला वळू, भर बाजारात घातला उच्छाद; पाहा भयंकर VIDEO पोलीस तपास सुरू पोलिसांना या मुलांचे देह मिळाल्यानंतर त्यांनी महिलेला अटक केली आहे. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र एक माता आपल्या पोटच्या गोळ्यांना असं कसं ठार करू शकते, असा सवाल पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत. आपल्या प्रियकरापासून झालेल्या मुलांना केवळ प्रियकर सोडून गेल्यामुळे या महिलेने मारून टाकले. अशा महिलेला कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत.
  Published by:desk news
  First published: