Home /News /crime /

गरोदर मैत्रिणीला आधी विटांनी ठेचलं, मग पोट फाडलं अन्...; महिलेचं कृत्य वाचून हादराल

गरोदर मैत्रिणीला आधी विटांनी ठेचलं, मग पोट फाडलं अन्...; महिलेचं कृत्य वाचून हादराल

रोसाल्बानं फ्लेवियावर विटेनं अनेक वार केले, यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर रोसाल्बानं चाकूने तिचं पोट फाडलं आणि पोटातील गर्भ बाहेर काढला

    नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : इतिहासात गुन्हेगारीच्या अनेक भयंकर घटनांनी संपूर्ण जगालाच हादरवलं होतं. यातील अनेक घटना अशा होत्या ज्या ऐकूनच लोक सदम्यात गेले. गुन्हेगारीबाबतच्या अनेक गोष्टींचे परिणामही अतिशय भयंकर असतात. नुकतंच ब्राझीलमधून अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेचा अतिशय वेदनादायी मृत्यू झाला. हैराण करणारी बाब म्हणजे महिलेची हत्या तिच्याच मैत्रिणीने केली (Woman Killed Pregnant Friend). डेली स्टारच्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या कॅनेलिन्हा येथे गेल्या 27 ऑगस्टला हृदयद्रावक घटना घडली. 24 वर्षीय फ्लेविया गोडिन्हो माफ्रा ९ महिन्यांची गरोदर होती. यावेळी तिची मैत्रिण रोसाल्बा मारिया ग्रिम हिनं तिचं खोटं बेबी शावर केलं आणि फोटोशूट करण्याची ऑफर दिली. ती आपल्या मैत्रिणीला एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेली जिथे विटांचं काम सुरू होतं. रोसाल्बानं फ्लेवियावर विटेनं अनेक वार केले, यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर रोसाल्बानं चाकूने तिचं पोट फाडलं आणि पोटातील गर्भ बाहेर काढला (Woman Steal Baby from Friends Womb). यानंतर तिने महिलेला तिथेच मरण्यासाठी सोडून दिलं, या घटनेनंतर महिलेचा मृत्यू झाला (Woman Killed Her Friend With Brick). फ्लेवियाच्या निधनानंतर रोसाल्बा आपल्या पार्टनरसोबत एका रुग्णालयात पोहोचली. तिनं आपल्या पार्टनरलाही अंधारात ठेवलं. तिनं आपल्या पार्टनरला सांगितलं की ती गरोदर आहे. जेव्हा ती बाळ सोबत घेऊन आली तेव्हा तिने त्याला सांगितलं की हे आपलंच बाळ आहे. रुग्णालयात पोहोचताच तिने डॉक्टरांना आपली अचानक डिलिव्हरी झाल्याचं सांगितलं. मात्र डॉक्टरांनी तिच्यावर संशय आला आणि त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला, यानंतर महिलेला पकडण्यात आलं. कोर्टात महिलेनं सांगितलं की तिला फ्लेवियाचा राग येत असे आणि तिचं मुल तिला चोरायचं होतं. यासाठी तिने ऑनलाईन रिसर्च करून हे शोधलं की पोटातून बाळ बाहेर कसं काढतात. या संपूर्ण घटनेत महिलेच्या पतीलाही दोषी मानलं जात होतं. मात्र नंतर हे समोर आलं की यात त्याचा काहीही हात नाही. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं. महिलेला 57 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Murder, Pregnant woman

    पुढील बातम्या