Home /News /crime /

लग्नानंतर 2 महिन्यातच घटस्फोट; मग राहिली लिव्ह इनमध्ये, अखेर महिलेचं प्रियकरासोबत विकृत कृत्य

लग्नानंतर 2 महिन्यातच घटस्फोट; मग राहिली लिव्ह इनमध्ये, अखेर महिलेचं प्रियकरासोबत विकृत कृत्य

पूनम जाटव नावाची महिला करण सिंह नावाच्या व्यक्तीसोबत भाड्याच्या घरात राहात होती. दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने पूनमने संपूर्ण जोर लावून करणच्या डोक्यात काठीने वार केला.

  नवी दिल्ली 18 डिसेंबर : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका महिलेनं आपल्या पार्टनरच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केलं. यानंतर त्याला रुग्णालयात घेऊन गेली आणि तिथून फरार झाली. महिला आपल्या पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहात होती. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. ही घटना राजस्थानच्या अलवर येथील आहे.

  आधी Kiss,नंतर सिगारेट; मग गर्लफ्रेंडकडून बॉयफ्रेंडवर Gun Shot

  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलवर शिवाजी ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. पूनम जाटव नावाची महिला करण सिंह नावाच्या व्यक्तीसोबत शहरातील बुध विहार कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहात होती. दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने पूनमने संपूर्ण जोर लावून करणच्या डोक्यात काठीने वार केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. यानंतर महिलेनं करणच्या वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. करणच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. करणच्या वडिलांनी आपला मोठा मुलगा दीपक याला रुग्णालयात पाठवलं. महिला पीडिताला त्याच अवस्थेत सोडून फरार झाली. यादरम्यान करणचा मृत्यू झाला होता (Woman Killed her Live in Partner after Dispute). त्याच्या कुटुंबीयांनी पूनमविरोधात तक्रार दाखली केली. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. जवळपास पाच महिन्यांनंतर पोलिसांनी पूनमला एनईबी ठाणे परिसरातून अटक केली आहे. लग्नानंतर 7 वर्षांनी पतीने घेतला 2 मुलांसह पत्नीचा जीव; धक्कादायक कारण समोर पोलिसांनी अनेक महिने या महिलेचा शोध घेतला, मात्र ती सापडत नव्हती. पोलिसांनी सांगितलं की या काळात ही महिला आपल्या मैत्रिणींच्या घरी फिरत राहिली. मात्र अखेर ती पोलिसांना सापडलीच. यानंतर कोर्टात हजर करून तिला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की पूनमचं अनेक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर दोन महिन्यांतच तिचा घटस्फोट झाला. यानंतरच ती करणसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Murder, Relationship

  पुढील बातम्या