प्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण

प्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात प्रियकराला भेटण्यासाठी जात असताना होणारी पतीची अडचण महिलेला नको वाटत होती. पोलिसांनी (Police) अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा खुलासा करून आरोपीला न्यायालयात हजर केलं.

  • Share this:

भोपाळ 21 जून: एका महिलेनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या (Woman Killed her Husband) केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर तिनं पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीची योजना गूगलवर सर्च केली. पोलीस तपासात असं समोर आलं, की लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात प्रियकराला भेटण्यासाठी जात असताना होणारी पतीची अडचण महिलेला नको वाटत होती. पोलिसांनी (Police) अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा खुलासा करून आरोपीला न्यायालयात हजर केलं. ही घटना मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील आहे.

पोलिसांनी सांगितलं, कि मृताच्या पत्नीनं स्वतः या घटनेची माहिती दिली होती. मात्र, आरोपीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं तिनं दाखवलं होतं. तपासादरम्यान पोलिसांनी मृताच्या पत्नीवर संशय आला असता त्यांनी तिची कसून चौकशी केली असता तिनं आपला गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

पोलिसांनी सांगितलं, की नेबहरदामध्ये खेडीपुरा क्षेत्रात 18 जून रोजी आमिरची हत्या झाली होती. चोवीस तासात पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. प्रेम प्रकरणामुळे महिलेनं आपल्या प्रियकरासोबत मिळून ही हत्या केली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे कॉल डिटेल तपासले. यात असं समोर आलं, की आमिरची हत्या त्याची पत्नी तबस्सुम हिने आपला प्रियकर इरफान याच्यासोबत मिळून केली आहे.

अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

पोलिसांनी हत्येमध्ये वापरला गेलेला हातोडा, रक्तातानं भिजलेले कपडे, मोबाईल फोन, मृताचे हातपाय बांधण्यासाठी वापरलेली ओढणी जप्त केली आहे. पोलीस तपासात समोर आलं, की आमिर हा आधी महाराष्ट्रात काम करत असे. आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या तबस्सुमला इरफाननं भरपूर मदत केली. याच कारणामुळे दोघांमधील जवळीक वाढली. लॉकडाऊननंतर आमिर हरदा येथे येऊन राहू लागला. तबस्सुमच्या पतीला इमरान आणि आपल्या पत्नीचं सारखं भेटणं आवडत नसे. याच कारणामुळे इरफाननं तबस्सुमसोबत मिळून आमिरला मारण्याचा कट रचला. मिळालेल्या माहितीनुसार, आमिरला दमा होता. पत्नीनं त्याच्या दम्याच्या औषधासोबत त्याला आणखी एक औषध दिलं, यामुळे आमिर बेशुद्ध झाला. यानंतर रात्री इरफान घरी आला आणि तबस्सुमसोबत मिळून त्यानं आमिरची हत्या केली.

स्वबळावर निवडणुका लढण्याच्या नाऱ्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, सरकारला टोला

तबस्सुमनं आमिरचे हातपाय ओढणीनं बांधले आणि इरफाननं त्याच्या डोक्यावर हातोड्यानं वार केले, यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर मृताच्या पत्नीनं स्वतःच पोलीस ठाण्यात जात याबद्दलची माहिती दिली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांनी वाटलं, की ही हत्या चोरीच्या उद्देशानं केली गेली आहे. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या काही पुराव्यांमुळे पोलिसांना महिलेवर संशय आला आणि पोलिसांनी तिचे कॉल डिटेल तपासले. पोलिसांनी यातून समजलं, की महिला इरफानसोबत बराच वेळ बोलायची. तिच्या फोनमधील गूगल हिस्ट्री तपासली असता पोलिसही हैराण झाले. तिनं गूगलवर सर्च केलं होतं, की हत्येनंतर मृतदेहाचे हातपाय कसे बांधावे आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी.

Published by: Kiran Pharate
First published: June 21, 2021, 8:38 AM IST

ताज्या बातम्या