Home /News /crime /

पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनं रचला कट; हत्येसाठी प्रियकरालाच दिली 3 लाखाची सुपारी

पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनं रचला कट; हत्येसाठी प्रियकरालाच दिली 3 लाखाची सुपारी

मृत रवींद्र सिंह (Ravindra Singh) हा रेल्वेचा कर्मचारी होता. त्याची पत्नी मीरा देवी (Meera Devi) हिचे दोन वर्षांपासून संदीप नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते.

पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनं रचला कट; प्रियकरालाच दिली 3 लाखाची सुपारीरामगड (झारखंड) 26 जून : नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेनिमित्त पतीला वाचवणाऱ्या सावित्रीच्या कथेला उजाळा मिळाला. समाजातल्या अनेक सावित्रींच्या कथा वृत्तपत्रं, सोशल मीडियावर झळकल्या. त्याचवेळी झारखंडमधल्या (Jharkhand) एका 'सावित्री'नं नोकरीच्या लालसेपोटी नवऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली. या पत्नीनं आपल्या प्रियकरालाच आपल्या पतीला ठार मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. रामगड जिल्ह्यातल्या (Ramgarh District) बडकाकाना रेल्वे पोलिसांनी (Badka kana Railway Police) ही खुनाची घटना उघडकीस आणली. मृत रवींद्र सिंह (Ravindra Singh) हा रेल्वेचा कर्मचारी होता. त्याची पत्नी मीरा देवी (Meera Devi) हिचे दोन वर्षांपासून संदीप नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. रवींद्र सिंह याला त्याची खबर लागताच मीरा देवी हिनं पतीला आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या प्रियकरासमवेत पतीच्या हत्येचा (Murder) कट रचला. पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला पतीच्या जागेत रेल्वेत सरकारी नोकरी मिळेल आणि आपण प्रियकरासोबत मजेत आयुष्य घालवू अशी तिची योजना होती. पण पोलिसांनी रवींद्र सिंह यांच्या मृत्यूची कसून चौकशी केली आणि मीरादेवी आणि तिच्या प्रियकराचं कट कारस्थान उघडकीस आलं. 370 महिला, 7 मोबाईल आणि...; Video Call करून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक याबाबत अधिक माहिती देताना बडकाकाना पोलीस ठाण्याचे प्रभारी मंगलदेव ओराओं म्हणाले, की मीरा देवीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आपला पती रवींद्र सिंह याची हत्या केली. त्यासाठी तिनं प्रियकर संदीप यालाच 3 लाखांची सुपारी दिली होती आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून 1500 रुपये दिले होते. पतीची नोकरी मिळवून प्रियकराबरोबर मजेत राहण्याच्या उद्देशानं पत्नीनंच ही हत्या घडवून आणली असून, यामध्ये मीरा देवीचा प्रियकर संदीप याचा मित्र रोशन याचाही सहभाग होता. या सर्वांना पकडण्यात आलं आहे. अशी केली हत्या : संदीपचा मित्र रोशन यानं रवींद्र सिंह यांना पार्टी करण्यासाठी बोलावलं. त्यावेळी संदीपही तिथं होता. तिघांनी भरपूर मद्यपान केलं. त्यानंतर तिघंही मोटरसायकलवरून रेल्वे मैदानावर फेऱ्या मारत होते. नंतर ते डिझेल शेडजवळच्या निर्जन, कच्च्या रस्त्याकडे गेले. तिथं तिघंही लघुशंकेसाठी थांबले. त्यानंतर जेव्हा रवींद्र सिंह मोटरसायकलवर बसायला गेले, तेव्हा संदीपनं त्याचा गळा वायरनं आवळला आणि त्याला ठार केलं. नंतर दगडानं त्याचा चेहरा ठेचला आणि मृतदेह (Body) झुडपात फेकून दोघे निघून गेले. लग्नानंतर 3 दिवसातच सासरकडच्यांकडून नवरीचा अमानुष छळ; गुप्तांगावर गरम सळईनं चटके असं झालं सत्य उघड : रवींद्र सिंहचा मृतदेह मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. तेव्हा त्याचे कॉल डिटेल्स (Call Details) तपासताना पोलिसांना रोशनचं नाव कळलं. त्यावरून तंत्रज्ञान विभागाच्या मदतीनं पोलिसांनी रोशनचा ठावठिकाणा शोधला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं सगळं खरं सांगून टाकलं आणि या खुनाचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी रवींद्र सिंहच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Jharkhand, Murder, Women extramarital affair

पुढील बातम्या