मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /जळगाव : अनैतिक संबंधात सासऱ्याचा अडथळा; प्रियकराच्या मदतीने असा काढला काटा

जळगाव : अनैतिक संबंधात सासऱ्याचा अडथळा; प्रियकराच्या मदतीने असा काढला काटा

अटक करण्यात आलेले आरोपी

अटक करण्यात आलेले आरोपी

जळगाव जिल्ह्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Yawal, India

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 25 मार्च : राज्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. अनैतिक संबंधात सासऱ्याचा अडथळा वारंवार येत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्याचा खून केल्याची घटना किनगाव येथे उघडकीस आली आहे.

याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने आरोपी प्रियकरासह किनगावातील सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. जावेद शाह अली शाह फकीर (वय-32, प्रतिभा नगर, वरणगाव, ह.मु.उदळी, ता.रावेर) आणि मीनाबाई विनोद सोनवणे (वय-30, किनगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विनोद सोनवणे, असे या महिलेच्या पतीचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पुढे कारवाई करत खूनाचा उलगडा केला.

आरोपीने दिली खुनाची कबुली - 

किनगाव येथील 58 वर्षीय व्यक्तीच्या खून प्रकरणी उदळी, ता. रावेर येथील 28 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या सुनेने तिच्या प्रियकरच्या मदतीने हे कृत्य केले. प्रियकर वारंवार किनगाव येथे यायचा. तेव्हा तो इथे का येतो? याचा जाब मृत भीमराव सपकाळे यांनी विचारला होता. त्याचा त्याला सतत राग यायचा. यातुन हा गुन्हा घडला असुन संशयितास पोलिसांनी भुसावळ येथून रात्री ताब्यात घेतले व त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अनैतिक संबंध आणि तंत्र-मंत्राच्या नादात आईचे भान हरपले, दोन निष्पाप मुलांचा घेतला जीव

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने केला खून -

उदळी, ता. रावेर येथील जावेद शाह अली शाह फकीर या तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार, किनगाव ता. यावल येथील भीमराव सपकाळे (58) यांची सून मीना विनोद सोनवणे हिच्या बहिणीचे रावेर तालुक्यातील उदळी येथे सासर आहे आणि मीना ही विवाहापुर्वी उदळी येथे जायची. तेथे तिची ओळख जावेद शहा अली शाह फकीर सोबत झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हा विवाहनंतर जावेद शाह हा किनगाव येथे येऊ-जाऊ लागला होता. दरम्यान, त्याचं येणं जाणं हे भीमराव सोनवणे यांना आवडत नव्हतं.

त्यातच जावेद शहा हा गुरुवारी देखील दुपारी आला आणि त्याने आपल्या दुचाकीवर भीमराव सपकाळे यांना घेऊन यावल व गावात फिरला सोबत दारू प्यायला आणि रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चुंचाळे जवळील पुलावर येऊन त्याचं भांडण भीमराव सोनवणे यांच्यासोबत झालं आणि तेथेच त्यांनी चाकूने वार करून त्यांची हत्या केली, असे त्याने पोलिसांना जबाब सांगितले.

विवाहितेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेऊन पोलिसांचा आरोपीवर संशय बळावला होता. त्यानंतर त्याचा शोध घेत असताना तो भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलजवळ मिळून आला आणि तिथून त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Jalgaon, Murder