मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एकाच कंपनीत काम करायचे, शेजारी राहायचे पण एक दिवस...; पुण्यात शेजाऱ्याकडून 65 वर्षीय महिलेची हत्या

एकाच कंपनीत काम करायचे, शेजारी राहायचे पण एक दिवस...; पुण्यात शेजाऱ्याकडून 65 वर्षीय महिलेची हत्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

11 जुलै रोजी रात्री आरोपीने घरात घुसून महिलेचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिचे सर्व दागिने व रोख रक्कम घेऊन दाराला बाहेरून कडी लावून तो पळून गेला.

  • Published by:  Kiran Pharate

पुणे 19 जुलै : दरोडा आणि चोरीच्या गुन्ह्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. यात दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान एका 65 वर्षीय महिलेची शेजाऱ्याने गळा दाबून हत्या केली आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपीने तिचे सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरली. यानंतर त्याने महिलेच्या घराला बाहेरून कुलूप लावलं आणि शहरातून पळ काढला (Woman Killed by Neighbour in Robbery Bid).

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या गुप्तचरांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी पोहोचण्यापूर्वीच अटक केली. पारुबाई सावंत या कात्रज येथील भिलारेवाडी येथे १३ जुलै रोजी घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या घराला बाहेरून कुलूप होते. त्या दिवशी त्यांचा भाऊ त्यांना घरी भेटायला गेला होता. मात्र पारूबाईंच्या घराला बाहेरून कुलूप होतं. त्यानंतर त्याने खिडकीत डोकावले तर आपली बहिण बेडवर पडली असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी कुलूप तोडले असता पारूबाई मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.

त्यांचे कानातले आणि मंगळसूत्र चोरीला गेले होते. त्या ज्या बॉक्समध्ये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने ठेवत असे, तो बॉक्सही रिकामा होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस चौकशीत असं समोर आलं की महिलेचा शेजारी शेजारी बादल उर्फ ​​सुग्गा बनवारी (२७) रा. उत्तर प्रदेश हा गायब आहे. त्याने सर्वप्रथम पत्नी, मुले आणि वडिलांना उत्तर प्रदेशात हलवले आणि 12 जुलै रोजी तो पुण्यातून पळून गेला.

पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस हवालदार आशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने तपास केला. पारूबाई या एकट्या राहत असून त्यांच्या घरात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असल्याचं आरोपीला माहिती होतं.

11 जुलै रोजी रात्री आरोपीने घरात घुसून महिलेचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिचे सर्व दागिने व रोख रक्कम घेऊन दाराला बाहेरून कडी लावून तो पळून गेला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनशी संलग्न वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ काळसकर म्हणाले, “आरोपी गेल्या 10 वर्षांपासून पुण्यात राहत होता आणि पीडितेसोबत क्रशरमध्ये काम करत होता. महिला आपला सर्व पगार आणि सोन्याचे दागिने तिच्या घरात एका पेटीत ठेवत असे. सणासुदीला ती दागिने घालायची. आरोपीने तिच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवले आणि 11 जुलै रोजी त्याने तिची हत्या केली. त्याने तिचे सर्व दागिने काढून घेतले आणि शहरातून पळून गेला.”

“आरोपी त्याच्या घरी पोहोचण्यापूर्वी आमची टीम उत्तर प्रदेशातील परायगराज येथे पोहोचली आणि त्याला पकडले. आम्ही आरोपींने चोरलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे,” असे निरीक्षक काळसकर यांनी सांगितले.

First published:

Tags: Murder, Pune crime