• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • महिलेनं रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; आजारी पतीकडून उकळले पैसे, असं फुटलं बिंग

महिलेनं रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; आजारी पतीकडून उकळले पैसे, असं फुटलं बिंग

महिला या खेळाच्या इतकी आहारी गेली होती, की तिनं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला (Woman Kidnapped Herself for Money).

 • Share this:
  नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : कोणत्याही गोष्टीचं व्यसन (Gambling Addiction) लागणं हे वाईटच आहे. यात माणूस कोणतीही हद्द पार करू शकतो. स्पेनमध्ये राहणाऱ्या एरा महिलेलाही असंच व्यसन जुगार खेळण्याचं व्यसन लागलं होतं. महिला या खेळाच्या इतकी आहारी गेली होती, की तिनं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला (Woman Kidnapped Herself for Money). विशेष म्हणजे हा बनाव तिनं तेव्हा रचला जेव्हा तिचा पती रुग्णालयात भर्ती होता. 'बाळाची हत्या कशी करावी?' Google Search केल्यानं अडकला पोलिसांच्या जाळ्यात पती घरात नसल्यामुळे त्याला आपल्या पत्नीनं रचलेल्या या बनावाबद्दल काहीही समजलं नाही (Woman Fooled Husband for Money). याच दरम्यान पत्नीनं आपल्या अपहरणाचे खोटे मेसेज पाठवत तिची सुटका करण्यासाठी पाच लाख देण्याच्या मागणीचे मेसेज पतीला पाठवले. भोळ्या पतीनं ही रक्कम अपहरणकर्त्याला दिली. त्यानं याची चौकशीही केली नाही की खरंच त्याची पत्नी किडनॅप झाली आहे का. 47 वर्षाच्या या महिलेनं जबरदस्त ड्राम रचला. तिनं आपलं अपहरण झाल्याचा बनाव रचून पतीला फोनवर म्हटलं की तिला काही लोकांनी पकडलं आहे आणि तिला सोडण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे मिळताच पत्नी उधारी फेडून बिंगो कार्ड घेऊन बिंगो हॉलमध्ये गेल्याचं पोलिसांना दिसलं. महिला बाडालोनाच्या कसीनोमध्ये होती, जेव्हा पोलिसांनी तिला पकडलं. 15 वर्षीय मुलाचं 5 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य; CCTV फुटेज पाहून वडिलही हादरले! महिलेच्या पतीनं अपहरणकर्त्यांना पैसे दिले, मात्र या अपहणाबद्दल पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी ते नंबर ट्रॅक केले, ज्यावरुन महिलेनं आपल्या पतीला मेसेज केले होते, की किडनॅपर्सला पैसे कसे द्यायचे. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी या व्यक्तीच्या पत्नीच्या हालचालींवर नजर ठेवली. यानंतर पतीला हे संपूर्ण प्रकरण समजलं. सध्या या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: