मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आपल्याच मुलाच्या मारेकऱ्याला घालत होती पाठिशी, कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

आपल्याच मुलाच्या मारेकऱ्याला घालत होती पाठिशी, कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

आपल्या मुलाचा खून कुणी केला, हे तिला पक्कं ठाऊक होतं. मात्र तरीही ती पोलिसांसमोर खोटं बोलत राहिली.

आपल्या मुलाचा खून कुणी केला, हे तिला पक्कं ठाऊक होतं. मात्र तरीही ती पोलिसांसमोर खोटं बोलत राहिली.

आपल्या मुलाचा खून कुणी केला, हे तिला पक्कं ठाऊक होतं. मात्र तरीही ती पोलिसांसमोर खोटं बोलत राहिली.

  • Published by:  desk news

ब्रिटन, 3 जानेवारी: आपल्या मुलाचा खून (Murder of son) कुणी केला हे माहित असूनही त्याची आई (Mother) त्याच्या मारेकऱ्याला (Murderer) पाठिशी घालत असल्याची (Kept hiding) बाब समोर आली आहे. आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला वाचवण्यासाठी ती सतत खोटं बोलत असल्याचंही समोर आलं आहे. एक आई आपल्या मुलाच्या मारेकऱ्याची माहिती असूनही खोटं का बोलत होती, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. मात्र तपासात त्याचंही उत्तर पोलिसांनी शोधून काढलं आहे.

बॉयफ्रेंडनं केला खून

ब्रिटनमधील केंब्रिजशायर भागात राहणाऱ्या 29 वर्षांच्या लुसीला डेटी नावाचा अडीच वर्षांचा मुलगा होता. लुसीचं 31 वर्षांच्या मिशेलसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. अनेकदा लुसी घरात नसताना मिशेल तिच्या घरात राहत असे. लुसीचा मुलगा टेडीवर त्याचा विशेष राग होता आणि आपल्या प्रेमसंबंधात तो अडथळा ठरत असल्याची सल त्याला होती. त्यामुळे छोट्यामोठ्या गोष्टीवरून अडीच वर्षांच्या बाळाचा तो छळ करत होता.

बाळाला आपटलं भिंतीवर

लुसी घरात नसताना एक दिवस मिशेलनं टेडीला उचलून त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. लुसी घरी आल्यावर जखमी झालेला टेडी तिला दिसला. मात्र तरीही ती बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली नाही. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे टेडीचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

टीव्हीवरही बोलले खोटं

हे प्रकरण केंब्रिजशायर भागात भलतंच गाजलं. टीव्हीवर दिलेल्या प्रतिक्रियेतही आपलं आपल्या मुलावर प्रचंड प्रेम होतं आणि त्याचा जीव कसा गेला, हे आपल्याला माहितही नसल्याचं तिने सांगितलं. मात्र मिशेलला अटक करून तपास केला असता, त्याने भिंतीवर आपटल्यामुळे बाळाच्या मेंदूत फ्रॅक्चर झालं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.

हे वाचा- लेकांना अंत्यविधीपासून रोखलं; लेकींनीच आईला दिला खांदा, कारण वाचून पाणवतील डोळे

कोर्टानं सुनावली शिक्षा

या प्रकरणी कोर्टानं मिशेलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर लुसीचा 2 वर्षांची शिक्षा सुुनावली आहे.

First published:

Tags: Britain, Crime, Mother, Murder, Police