रांची 23 नोव्हेंबर : झारखंडच्या (Jharkhand) गोड्डा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एक महिला आपल्या पतीचं लग्न (Marriage of Husband) थांबवण्यासाठी झारखंडची राजधानी रांची इथून थेट गुड्डा येथे पोहोचली. तिनं पोलिसांकडे हे लग्न थांबवण्याची मागणी केली. पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यानं महिलेनं थेट SDPO यांना पत्र लिहित प्रकरणाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं पोलीस अधिकाऱ्यांसमोर याबाबत काही पुरावेही मांडले. एसडीपीओ यांचं असं म्हणणं आहे, की हे प्रकरण खरं असल्याचं सिद्ध झाल्यास आरोपीवर कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या रातू काटीताड ठाण्याच्या क्षेत्रात राहणारी मनुस्मृती आपल्या पतीचं लग्न रोखण्यासाठी गोड्डा इथे पोहोचली. पीडित महिलेनं सांगितलं की 2019 मध्ये तिचं लग्न गोड्डाच्या गुलजारबाग येथील रहिवासी विभाससोबत माजी ठाणा प्रभारी रेणू गुप्ता यांच्या उपस्थितीत दुर्गा मंदिरात झालं होतं. या प्रेमविवाहानंतर महिलेचा सासरी सतत छळ होत होता. लग्नानंतर चार महिन्यांनी तिचा पती विभासने म्हटलं की त्याला अभ्यास करता येत नाहीये. यामुळे ती गोड्डामधून रांचीला गेली. महिला रांची येथे गेलेली असतानाही आपल्या पतीसोबत तिचं फोनवर बोलणं सुरुच होतं.
पीडित महिलेनं सांगितलं की तिला एक कॉल आला. यात तिला सांगितलं गेलं की तिचा पती विभास लग्न करत आहे. यानंतर पीडित महिला आपल्या कुटुंबीयांसोबत रांचीमधून गोड्डा येथे आली आणि पोलिसांकडे हे लग्न थांबवण्याची मागणी केली. महिलेनं सांगितलं की पोलिसांनी या प्रकरणात तिची मदत करण्यास नकार दिला. यानंतर पीडितेनं SDPO यांना पत्र लिहित मदत मागितली. आपल्या पतीचं लग्न थांबवण्यासाठी ती सासरीही गेली. मात्र, घराला कुलूप होतं.
SDPO आनंद मोहन सिंह यांनी सांगितलं की त्यांना पीडितेचं पत्र मिळालं आहे. लग्नाचा योग्या पुरावा असल्यास युवकावर योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले असून महिलेला रांचीला पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेला प्रकरणाचा तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.