Home /News /crime /

'20 रुपये हातावर ठेवून तो आमच्या आईला घेऊन गेला'; जन्मदातीच्या प्रेमप्रकरणामुळे लेकरांवर कोसळलं आभाळ

'20 रुपये हातावर ठेवून तो आमच्या आईला घेऊन गेला'; जन्मदातीच्या प्रेमप्रकरणामुळे लेकरांवर कोसळलं आभाळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका महिलेला तिच्या प्रियकराने 20 रुपये दिले. ते पैसे त्याने तिच्या मुलांना द्यायला सांगितले आणि चॉकलेट (Chocolate), बिस्किट (Biscuits) आणायला दुकानात पाठवलं

पाटणा 27 मे : लहान-लहान दोन मुलांची आई (Mother) तिच्या प्रियकरासोबत (Lover) पळून गेल्याची घटना घडली आहे. आपली मुलं, पती आणि संसार सोडून ही महिला प्रियकरासोबत पळून गेली आणि त्याच्यासोबत संसार थाटला. मुख्य म्हणजे या महिलेनं मुलांना 20 रुपये देऊन खाऊ आणायला दुकानात पाठवलं आणि नंतर प्रियकरासोबत निघून गेली. आई पळून गेल्याने मुलं रडूनरडून बेहाल झालीत तर पत्नी अचानक पळून गेल्यानं पतीलाही धक्का बसलाय. पत्नी पळून गेलीये हे लोकांना सांगावं तरी कसं आणि तिला शोधावं तरी कसं? असा प्रश्न या पतीला पडला होता. परंतु, नंतर त्याने हिंमत करत नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रारही दिली. ही घटना बिहारमध्ये (Bihar News) घडली आहे. बहिणीसोबतच्या रिलेशनशिपमुळे भडकला मुस्लिम बांधव, 25 वर्षीय तरुणाची केली हत्या झालं असं की बथवारिया पोलीस स्टेशन (Police Station) परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकराने 20 रुपये दिले. ते पैसे त्याने तिच्या मुलांना द्यायला सांगितले आणि चॉकलेट (Chocolate), बिस्किट (Biscuits) आणायला दुकानात पाठवले. तुम्ही चॉकलेट आणि बिस्किट आणून खाऊन घ्या, मी बँकेत (Bank) पैसे काढायला जाते, असं सांगितलं. मुलं चॉकलेट आणि बिस्किटे घेऊन परतली तेव्हा त्यांची आई घरात नव्हती आणि तिच्यासोबत असणारा तिचा प्रियकरही नव्हता. बिस्किटे खाल्ल्यानंतर मुलांनी आई परत येण्याची वाट पाहिली, पण ती परत आलीच नाही. दुपारपासून संध्याकाळ झाली आणि त्यानंतर रात्र होऊनही ही महिला परतली नाही. या संदर्भात दैनिक जागरणने वृत्त दिलंय. दरम्यान, मुलांनी घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. मुलांनी सांगितलेलं ऐकताच त्यांना धक्का बसला आणि तिला कसं शोधावं, नातेवाईकांना काय सांगावं? असा प्रश्न त्याला पडला. आता बँकेत गेलेली महिला घरी परतलेली नाही, हे कुटुंबातील सदस्यांनाही कळलं. त्यानंतर त्या सर्वांनी तिचा शोध घेतला. नातेवाईकांना सांगितलं आणि त्यांच्याकडेही तिचा शोध घेतला, परंतु तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपचा धक्कादायक अंत; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल शेवटी पतीने पोलीस ठाण्यात जाऊन एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, ‘मला दोन मुलं आहेत. 24 मे 2022 रोजी माझ्या पत्नीने मुलांना 20 रुपये दिले आणि म्हणाली की तुम्ही दुकानातून चॉकलेट, बिस्किटं आणून खा, मी बँकेतून पैसे घेऊन येत आहे. परंतु, त्यानंतर ती परतली नाही.’ याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे. महिला आणि तिच्या प्रियकराला शोधण्यासाठी मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीडीआरची मदत घेतली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
First published:

Tags: Love story, Shocking news

पुढील बातम्या