• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • दारुबंदीसाठी झगडणाऱ्या महिलेचा घरच्यांनीच केला खेळ खल्लास! जालन्यातील संतप्त घटना

दारुबंदीसाठी झगडणाऱ्या महिलेचा घरच्यांनीच केला खेळ खल्लास! जालन्यातील संतप्त घटना

Crime in Jalana: गावात सुरू असलेली अवैध दारु विक्री बंद (Liquor ban) व्हावी, यासाठी पोलिसांत निवेदन देणाऱ्या महिलेचा तिच्या घरच्यांनीच काटा काढला आहे.

 • Share this:
  जालना, 09 मे: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री (Illegal liquor sale) केली जाते. याचा खरा त्रास घरात राहणाऱ्या महिला वर्गाला होतो. पुरुष मंडळी दारू पिऊन घरी येऊन कोणत्याही कुरापती उकरून महिलांना मारहाण करतात. महिलांचा कौटुंबीक हिंसाचार थांबावा आणि गावात दारुबंदी (Liquor ban) व्हावी, यासाठी पुढाकार घेतलेल्या महिलेचा घरच्यांनीच काटा काढला आहे. दारुबंदीसाठी पोलिसांत निवेदन का दिलं? असा जाब विचारत घरच्यांनी संबंधित महिलेला बेदम मारहाण (woman beaten by her family) केली. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू (Woman death) झाला आहे. संबंधित मृत महिलेचं नाव बेबीबाई कृष्णा जाधव असं असून त्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जोगेश्वरीवाडी येथील रहिवासी आहेत. अंबड तालुक्यातील जोगेश्वरीवाडी गावात अवैध पद्धतीनं होणारी दारुविक्री थांबावी, यासाठी गावातील 12 महिलांनी पुढाकार घेतला होता. या महिला गटाचं प्रतिनिधित्व मृत महिला बेबीबाई जाधव या करत होत्या. हे वाचा-...अन् आई-भावानं डोळ्यादेखत सोडले प्राण; क्षणात हरपलं 3 वर्षाच्या मुलीचं विश्व पुरुष मंडळी दारू पिऊन घरातील महिलांवर हिंसाचार करतात, यामुळे या महिलांनी एकत्र येऊन अंबड पोलिसांत एक निवेदन दिलं होतं. या निवेदनात जोगेश्वरी गावात सुरू असलेले दारुचे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली होती. पण संबंधित महिलांची ही मागणी त्यांच्या घरच्यांनाच रुचली नाही. त्यामुळे गावातील दारुबंदीसाठी पोलिसांत निवेदन का दिलं? असा जाब विचारत बेबीबाई जाधव यांना त्यांच्याच कुटुंबातील पुरुषांनी जबरी मारहाण केली. हे वाचा-नागपूरात जमावाकडून दोन डॉक्टर्सला मारहाण; डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत घरातील अनेक पुरुषांनी एकत्र येऊन मारहाण केल्यानं या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. कृष्णा अमरसिंग जाधव, आकाश कृष्णा जाधव, कबीर अमरसिंग जाधव, इंद्रजित अमरसिंग जाधव, अमरसिंग भानसिंग जाधव अशी आरोपींची नाव आहेत. पोलिसांत निवेदन का दिलं असा जाब विचारण्यासोबतचं आरोपींनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली आहे. या जबरी मारहाणी जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: