• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Unique Love Story : लुडो खेळता खेळता दीरावर जडलं प्रेम, दोघंही घरातून पळाले आणि घडलं भलतंच

Unique Love Story : लुडो खेळता खेळता दीरावर जडलं प्रेम, दोघंही घरातून पळाले आणि घडलं भलतंच

ऑनलाईन लुडो (OnlineLudo) गेम खेळता खेळता महिलेचं तिच्या दीरावर (brother-in-law) प्रेम (Love) जडलं आणि दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा (marriage) निर्णय घेतला.

 • Share this:
  जोधपूर, 31 ऑगस्ट : ऑनलाईन लुडो (OnlineLudo) गेम खेळता खेळता महिलेचं तिच्या दीरावर (brother-in-law) प्रेम (Love) जडलं आणि दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा (marriage) निर्णय घेतला. दोघंही घरच्यांना गुंगारा देऊन पळून गेले आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. लवकरच लग्न करण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला. त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली होती. मात्र लग्न होण्यापूर्वीच दीर अचानक गायब (Vanished) झाला. असं जुळलं प्रेम राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणारी नितू नावाची महिला ऑनलाईन लुडो खेळाची चाहती होती. तिचा दीर प्रवीणदेखील हाच खेळत असे. दोघांचीही या खेळाच्या निमित्ताने चांगलीच गट्टी जमली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला नात्याचं कोंदण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि घर सोडून ते जोधपूरमध्ये एका ठिकाणी निघून आले. या दोघांनी एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. लवकरच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी कोर्टात नोंदणी करून तारीखदेखील निश्चित केली होती. भविष्यातील सुखी आयुष्याची स्वप्नं पाहत त्यांचं आय़ुष्य पुढं सरकत होतं. लग्नाची तारीख जवळ आली असतानाच नीतूला धक्का बसला. तिचा प्रियकर आणि दीर प्रवीण त्या दिवशी घरीच आला नाही. दुसऱ्या दिवशीदेखील तो घरी न आल्यामुळे तो गायब झाल्याचं नीतूच्या लक्षात आलं. तिनं पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली. प्रवीणच्या घरच्यांनीच त्याला गायब केल्याचा दावा नीतूनं केला आहे. हे वाचा - तालिबान्यांची ही POSITIVE बाब तुम्हाला दिसलीच नाही, आफ्रिदीनं तोडले अकलेचे तारे पोलीस घेतायत शोध हे लग्न होऊ नये, यासाठी प्रवीणच्या घरच्यांनी त्याला गायब केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी प्रवीणचा शोध सुरु केला आहे. अद्याप प्रवीणचा कुठलाही शोध लागला नसून तो नेमका कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नीतू आणि तिच्या पतीचं पटत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नीतू आणि तिच्या पतीमध्ये 8 वर्षांचं अंतर असून पतीसोबत राहण्याची इच्छा नसल्याचं नीतून सांगितलं आहे.
  Published by:desk news
  First published: