नवी दिल्ली 19 मार्च : दिल्लीत हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. दुर्गंधीमुळे लोकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मृ महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. विशेष म्हणजे, सराय काले खान परिसरातील सनलाईट कॉलनी पोलिसांना दुपारी बाराच्या सुमारास संशयास्पद पॉलिथिन आढळल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पॉलिथिन उघडले असता त्यात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले.
आईचा मृत्यू झाल्याचं रिंपलला वेटर्सनी सांगितलं होतं, हत्या प्रकरणात नवा खुलासा
पांढऱ्या रंगाच्या या पॉलिथिनमध्ये महिलेची कवटी, कमरेचा खालचा भाग, चिरलेला हात आणि हाताचा पंजा आढळून आला. ही बातमी परिसरात आगीसारखी पसरली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. माहिती मिळताच एफएसएल टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले. या हत्येचे गूढ उकलण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला तैनात करण्यात आले.
सराय काले खान येथे मेट्रोचे काम सुरु आहे. लोकल आणि ये-जा करणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशनवर पांढऱ्या पॉलिथिनमधून प्रचंड दुर्गंधी येत होती. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पॉलिथिनची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. पॉलिथिनमधील महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते.
पोलिसांनी पॉलिथिन उघडली असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे अनेक तुकडे करून कोणीतरी तो पॅक करून सन लाईट कॉलनी पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर फेकून दिला होता. पोलिसांनी लगेचच याठिकाणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या टीमला बोलावलं. त्यांना पॉलिथिनमध्ये महिलेची कवटी, नितंब, हात आणि हाताचा पंजा सापडला. टीमने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking news