नवी दिल्ली 29 सप्टेंबर : शेजाऱ्यांसोबत भांडण (Neighbors Fighting) होणं ही सामान्य बाब आहे. मात्र स्पेनमधील (Spain) एक महिला आपल्या शेजारणीवर इतकी नाराज होती की तिनं तिची दोन बोटंच खाल्ली (Woman Eats her Neighbors Fingers). पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चुकीच्या उद्देशानं हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महिलेविरोधात दाखल केला आहे. आरोपी महिलेला संशय होती ती तिची शेजारी जादूटोणा करते. याच गोष्टीवरुन त्यांच्या वाद झाला आणि नंतर तो हाणामारीत बदलला.
दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; भयावह अवस्थेत आढळली चिमुकली
द सननं दिलेल्या वृत्तानुसार, स्पॅनिश पोलिसांनी सांगितलं की Seville मध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेला आपल्या 48 वर्षीय शेजारणीवर हल्ला केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेनं आधी आपल्या दातांनी शेजारी राहणाऱ्या महिलेची दोन बोटं तोडली आणि नंतर ती खाऊन टाकली. या घटनेवेळी आरोपी महिलेची सहा वर्षाची मुलगीही तिथेच उपस्थित होती.
आसपास राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पाहिलं की आरोपी महिला पीडितेला भयंकर मारहाण करत होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की आरोपी महिलेला संशय होता की शेजारीण तिच्यावर जादू टोना करत आहे. ती पाण्यात मीठ मिसळून आरोपी महिलेच्या घरावर शिंपडत असे. याच कारणामुळे दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि नंतर तो हाणामारीत बदलला.
पार्लरमध्ये घुसून विधवेवर 2तास अत्याचार; नाशकाला हादरवणाऱ्या घटनेतील नराधम गजाआड
पोलिसांनी सांगितलं, की आरोपी महिलेनं शेजारणीवर आधी मोठ्या दगडानं वार केला. पीडित महिला खाली कोसळल्यानंतर आरोपीनं आपल्या दातांनी तिची दोन बोटं तोडली आणि ती खाल्ली. पीडित महिला मुळची कांगो येथील रहिवासी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Viral news