जालना, 16 मे: भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथील एका प्रेमीयुगुलानं रविवारी पहाटे एकाच दोरीनं गळफास (Lovers Commits Suicide) घेऊन स्वतःला संपवलं आहे. ऐन लग्नाच्या दिवशी ( Marriage day) नववधूनं आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या (Girl commits suicide with lover) केल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृत तरुणीचा आज दुपारी (16 मे) विवाह संपन्न होणार होता. तिचा हळदी समारंभदेखील पार पडला होता. आपल्या आवडत्या व्यक्तीपासून वेगळं होण्याचं दुःख सहन न झाल्यानं या प्रेमीयुगुलांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पळून जाऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
18 वर्षीय स्नेहा राजू आव्हाड असं या मृत तरुणीचं नावं असून तिचे 21 वर्षीय तरुण नवनाथ सुरेश गायकवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. मागील एका वर्षापूर्वी त्यांच्या प्रेमसंबंधाला सुरुवात झाली होती. पण प्रेयसी स्नेहाचा अचानक विवाह ठरल्यानं या दोघांची काय करावं सुचलं नाही. त्यामुळं त्यांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एकाच दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सामना वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रियकर नवनाथ सुरेश गायकवाड या तरुणाचं मालखेडा रस्त्यावर टायर पंक्चर काढून देण्याचा छोटासा व्यवसाय होता. त्याचं त्याच्याच नात्यातील स्नेहा राजू आव्हाड नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. आज दुपारी मृत स्नेहाचा विवाह कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे या तरुणाशी होणार होता. मात्र विवाहाच्या दिवशीचं स्नेहा आपला प्रियकर नवनाथ सोबत पळून गेली. दोघंही भल्या पहाटे कोळेगाव येथून मालखेडा याठिकाणी आले.
हे ही वाचा-Yavatmal News : प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, एकटी असताना धारदार शस्त्राने वार
स्नेहाचं लग्न झालं तर जगू शकणार नाही, या विचारानं दोघंही प्रियकर नवनाथ यांच्या वडिलांच्या जुन्या घराकडे दोघं गेले. याठिकाणी त्यांनी पहाटे पाचच्या सुमारास एकाच दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली. ऐन लग्नाच्या दिवशी नवरी पळून गेल्यानं पाहुण्यांमध्ये गोंधळ सुरू होता. पण मृत्यूच्या बातमीनं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ऐन लग्नाच्या दिवशी प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं गावात एकच खळबळ उडाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.