मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! मोबाईलवरुन सासूसोबत झाला वाद, सुनेनं 2 मुलींसह घेतली विहिरीत उडी

धक्कादायक! मोबाईलवरुन सासूसोबत झाला वाद, सुनेनं 2 मुलींसह घेतली विहिरीत उडी

सासूनं आपल्या सुनेकडून मोबाईल हिसकावून घेतला. यावरुन सून नाराज होती, याच कारणामुळे तिनं हे पाऊल उचललं.

सासूनं आपल्या सुनेकडून मोबाईल हिसकावून घेतला. यावरुन सून नाराज होती, याच कारणामुळे तिनं हे पाऊल उचललं.

सासूनं आपल्या सुनेकडून मोबाईल हिसकावून घेतला. यावरुन सून नाराज होती, याच कारणामुळे तिनं हे पाऊल उचललं.

  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 31 ऑगस्ट : एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मोबाईलवरून सासू आणि सुनेत वाद (Dispute Over Mobile) झाला. यानंतर 33 वर्षीय महिलेनं आपल्या दोन मुलींना विहिरीत फेकत स्वतःही आत्महत्या (Suicide) केली. विहिरीत फेकलेल्या दोन मुलींमधील एकीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचं कारण महिलेचं सासूसोबत झालेलं भांडण होतं, असं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासूनं आपल्या सुनेकडून मोबाईल हिसकावून घेतला. यावरुन सून नाराज होती, याच कारणामुळे तिनं हे पाऊल उचललं. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूर जिल्ह्यातील आहे.

प्रियकरानं चाकूनं भोसकून प्रेयसीला संपवलं; पोलिसांत जात सांगितलं धक्कादायक कारण

पोलिसांनी (Police) सांगितलं, की ही घटना छतरपूरपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या सटई ठाणा क्षेत्रातील पारवा गावात रविवारी संध्याकाळी घडली. रानी यादव यांनी आपल्या दोन मुलींना विहिरीत फेकलं. यानंतर स्वतःही आत्महत्या केली. विहिरीत फेकलेल्या दोन मुलींपैकी एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर, चार वर्षांची मुलगी सुदैवानं या घटनेत वाचली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तहसीलदाराला 1 लाख तर शिपायला 20 हजार, लाचखोरांची निघाली पोलिसांच्या दारात वरात

पोलिसांनी सांगितलं, की दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मोबाईलवरुन राणी यादव यांचं आपल्या सासूसोबत भांडण झालं होतं. गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की शनिवारी राणीच्या सासूनं तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेतला. यावरुन सूनेत आणि सासूमध्ये भरपूर वाद झाला. याच कारणामुळे नाराज सूनेनं हे पाऊल उचललं. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Suicide