मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सततच्या टोमण्यांना कंटाळून तिने संपवलं आयुष्य; राहत्या घरी घेतला गळफास

सततच्या टोमण्यांना कंटाळून तिने संपवलं आयुष्य; राहत्या घरी घेतला गळफास

सतत हुंड्याची मागणी, त्यासाठी दिला जाणारा त्रास आणि टोमणे यांना वैतागून एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

सतत हुंड्याची मागणी, त्यासाठी दिला जाणारा त्रास आणि टोमणे यांना वैतागून एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

सतत हुंड्याची मागणी, त्यासाठी दिला जाणारा त्रास आणि टोमणे यांना वैतागून एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

चंदिगढ, 6 डिसेंबर: सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या (Torture for dowry) त्रासाला कंटाळून महिलेनं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडा घेणं आणि हुंडा देणं हा  (Dowry is crime) कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही देशाच्या अनेक भागात हुंड्याचं स्तोम पाहायला मिळतं. अनेक सुशिक्षित घरांतही हुंड्यासाठी नव्या सुनेचा छळ केला जातो आणि तिचा माहेरी जाऊन हुंड्याची रक्कम घेऊन यायला भाग पाडलं जातं. काहीजण थेटपणे तर काहीजण अप्रत्यक्षपणे हुंड्यासाठी पत्नीचा आणि सुनांचा छळ करत असल्याचं चित्र वारंवार दिसतं. अशाच सुशिक्षित कुटुंबातील महिलेनं हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Woman commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हुंड्यासाठी असह्य त्रास

हरियाणाच्या सोहना राम मंदिर परिसरात राहणाऱ्या अरुण नावाच्या तरुणाचं ललिता नावाच्या तरुणीसोबत तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दीड वर्षांचा मुलगादेखील आहे. ललिता उच्चशिक्षित होती आणि आर्किटेक्ट होती. मात्र तिला नोकरी मिळाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून ललिताला हुंड्यावरून घरातून टोमणे मारले जात होते. तिच्या नणंदा आणि सासूकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिनं पंचायतीत तक्रारही केली होती. पंचायतीत सासरच्या मंडळींना समज देण्यात आली होती आणि सूनेला हुंड्यासाठी त्रास न देण्याची ताकीदही देण्यात आली होती. मात्र तरीही आपल्या वर्तनात कुठलीही सुधारणा न झालेल्या मंडळींनी सुनेला टोमणे मारणं आणि तिच्याकडं हुंड्यासाठी तगादा लावणं सुरूच ठेवलं होतं.

आत्महत्येचा निर्णय

ललितानं आपली कैफियत आईवडिलांनाही ऐकवली होती. पंचायत आणि आईवडिल या दोन्ही ठिकाणी कैफियत मांडूनदेखील टोमणे थांबत नव्हते आणि छळ संपत नव्हता. या परिस्थितीला कंटाळून तिनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरी गळफास घेऊन तिनं आपलं आय़ुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी सून दार उघडत नसल्याचं लक्षात आल्यावर घरच्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा पंख्याला लटकलेला तिचा मृतदेह त्यांना आढळला.

हे वाचा- वरळी सिलेंडर स्फोटात बाळाच्या मृत्यूनंतर वडिल आणि आईनेही सोडला जीव, मुंबई हळहळली

पोलीस तपास सुरू

ललिताच्या वडिलांनी हुंडाबळीची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी घरच्यांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Crime, Police, Suicide, Women